Sunny Leoney's 'Tier' video will be a surprise to you! | ​सनी लिओनीचा हा ‘टायर’ व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

सध्या सनी लिओनी सध्या लाइम लाईटपासून दूर आहे. पण सनीला चर्चेत राहणे चांगलेच जमते आणि त्याचमुळे चाहतेही तिला विसरू शकत नाही. किंबहुना सनीचं चाहत्यांना तिचे अस्तित्व विसरू देत नाही. अलीकडे सनीने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खास आहे, कारण यात सनी एका भल्या मोठ्या टायरसोबत वर्कआऊट करताना दिसतेय. या स्लो मोशन व्हिडिओत सनी हा भलामोठा टायर उचलत आहे. सनीच्या फिटनेसबाबत तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तिला अशी जबरदस्त एक्सरसाईज करताना पाहून सगळेच अवाक् आहेत. ‘अलीकडे झालेल्या के्रझी फूड पॉईजनिंगनंतर पुन्हा स्वत:त ताकद परत आल्यासारखे वाटतेय,’ असे सनीने लिहिलेय.
 


गतवर्षी सनी लिओनी ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत अरबाज खान मुख्य भूमिकेत दिसला होता. अर्थात सनीच्या या चित्रपट बॉक्स आॅफिस दणकून आपटला होता. त्यापूर्वी  शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील आयटम सॉँगमध्ये ती झळकली होती. 
सध्या सनी आपल्या इमेज मेकओव्हरमध्ये लागलीय. ‘पॉर्न स्टार’ ही इमेज सनीला पुसून काढायची आहे. बॉलिवूडमध्ये सनीला आत्तापर्यंत बोल्ड भूमिकाच मिळाल्या. त्यामुळे अलीकडे सनीने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये एक पीरियड ड्रामा फिल्म सनीने साईन केली आहे. यात सनी अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासही सनी उत्सुक आहे. माधुरी दीक्षित, कंगना राणौत, विद्या बालन अशा बड्या अभिनेत्रींनी या बायोपिकसाठी नकार दिला असतानाच सनीने मात्र यात इंटरेस्ट दाखवला आहे. अर्थात तूर्तास दिग्दर्शकांनी या बायोपिकसाठी सनीचे नाव फायनल केलेले नाही. या व अशा चित्रपटामुळे तरी आपली इमेज बदलेल, असा सनीचा कयास आहे. आता या प्रयत्नांत सनीला किती यश मिळते, ते बघूच.

ALSO READ : OMG : ​‘या’ कारणाने आठवडाभर झोपू शकली नव्हती सनी लिओनी !
Web Title: Sunny Leoney's 'Tier' video will be a surprise to you!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.