Sunny Leone's wax statue in Madam Tussaud; Measurement of body taken! | मॅडम तुसादमध्ये सनी लिओनीचाही मेणाचा पुतळा; असे घेतले शरीराचे मेजरमेंट!

बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी सध्या भलतीच खूश आहे. अर्थात सनीकडे तसे कारणही आहे. आपल्या सौंदर्याने तरुणांना घायाळ करणाºया सनीचा लवकरच मेणाचा पुतळा तयार केला जाणार आहे. होय, लवकरच  दिल्ली येथील मॅडम तुसादमधील म्युझियममध्ये सनीचा स्टॅच्यू बसविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री काजोल हिचा लंडनस्थित मॅडम तुसादमधील वॅक्स म्युझयिममध्ये मेणाचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची बातमी समोर आली होती. 

‘जिस्म-२’मधून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. आज सनीला कोणी ओळखत नसेल असा प्रेक्षक क्वचितच म्हणावा लागेल. कारण प्रत्येकाच्या तोंडी सनीचे नाव आहे. कदाचित सनीची हीच लोकप्रियता लक्षात घेता दिल्लीतील मॅडम तुसाद म्युझियममध्ये तिचा मेणाचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला असावा. 

दरम्यान, मेणाचा पुतळा तयार करण्यासाठी सनीचे बरेचसे फोटो आणि शरीराचे २०० मेजरमेंट घेण्यात आले आहेत. याविषयी मर्लिन एंटरटेनमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि व्यवस्थापक अंशुल जैन यांनी सांगितले की, सनीच्या वाढत्या चाहत्यांमुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. तिचे लाखो चाहते तिच्या मेणाच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढणे पसंत करतील. 

दरम्यान, जेव्हा याबाबतची बातमी सनीला समजली तेव्हा ती खूपच आनंदी झाली. सनीने म्हटले की, ‘मी खरोखरच खूप आनंदी आहे की, माझी निवड मॅडम तुसादकरिता करण्यात आली आहे. तिने यशाचे श्रेय तिच्या संपूर्ण टीमला दिले आहेत. यासाठी तिने टीमचे आभारही मानले आहेत. आता सनीला तिचा पुतळा बघण्याची उत्सुकता लागली आहे. 

दिल्लीच्या मॅडम तुसादमध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, सलमान खान, विल स्मिथ, डेविड बेकहम, बियोंस नोवेल्स, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, कपिल शर्मा, माझी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, करिना कपूर-खान, जस्टीन बीबर, किम कर्दाशियन यांचे मेणाचे पुतळे आहेत. 
Web Title: Sunny Leone's wax statue in Madam Tussaud; Measurement of body taken!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.