Sunny Leone shared this photo with her husband; The user said, 'Do not spread pornography'! | सनी लिओनीने पतीसोबतचा हा फोटो केला शेअर; यूजर्सनी म्हटले, ‘अश्लीलता नको पसरवू’!

आपल्या बोल्ड अ‍ॅण्ड हॉट अंदाजामुळे चाहत्यांना वेड लावणारी बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोवरून चर्चेत आहे. वास्तविक सनीला तिच्या या फोटोवरून ट्रोल केले जात आहे. बºयाचशा यूजर्सनी तर तिला या फोटोवरून अक्षरश: धारेवर धरले. अनेकांनी अश्लील कॉमेण्ट टाकताना सनीने अशाप्रकारची अश्लीलता पसरवू नये असे म्हटले आहे. 

सनीने काही वेळेपूर्वीच पती डेनियल वेबरसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटोमध्ये सनी खूपच हॉट अंदाजात बघावयास मिळत आहे. सनीचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर शूट दरम्यानचा आहे. सनीने या फोटोत काळ्या रंगाचा अतिशय बोल्ड ड्रेस घातला असून, हातात मोप पकडलेला आहे. फोटो बघून लगेचच लक्षात येते की, सनी तिच्या फोटोशूटसाठी तयार होत आहे, तर फोटोमध्ये पती डेनियल सनीचे मदत करताना दिसत आहे. 
 

सनीच्या या फोटोला आतापर्यंत कित्येक यूजर्सनी प्रचंड अश्लील अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या आहेत. काही यूजर्सनी सनी आणि तिच्या पतीवर निशाणा साधताना लिहिले की, ‘तू आणि तुझ्या पतीने आमच्या देशात अश्लीलता पसरविली आहे.’ दरम्यान, सनीला यापूर्वीदेखील अशा प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. सनी लवकरच साउथ चित्रपटात बघावयास मिळणार आहे. ‘वीरमांदेवी’ असे तिच्या चित्रपटाचे नाव असून, तो तेलगू भाषेत आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी ऐतिहासिक असून, यात सनी अतिशय डॅशिंग अंदाजात बघावयास मिळणार आहे. 
Web Title: Sunny Leone shared this photo with her husband; The user said, 'Do not spread pornography'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.