Sunny Leone to give tips to girls! | सनी लिओनी तरुणींना देणार मेकअप टिप्स !

अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच काही तरी हटके करण्यावर विश्वास ठेवते. आता पुन्हा एकदा ती असेच काहीसे करताना बघावयास मिळणार आहे. सुरुवातीला तिने पोर्न इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये तिने बरेचसे स्पेशल सॉन्ग केले. शिवाय ते तिच्या चाहत्यांच्या पसंतीसही उतरले. आता ती अभिनयाबरोबरच नव उद्योजक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा ब्रॅण्ड स्टारस्टक लॉन्च केला होता. तिच्या या प्रॉडक्टची डिमांड एवढी वाढली आहे की, ते आउट आॅफ स्टॉक झाले आहे. त्यामुळे तिच्यासमोर ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, या समस्येचा सामना करण्यासाठी सनीने एक सोल्यूशन शोधून काढले आहे. 

होय, सनी लवकरच तिच्या नव्या मेकअप अ‍ॅप्लिकेशनला डिजिटल प्लॅटफॉर्मवर लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर आपल्या या नव्या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांना मेकअप ट्यूटोरियलबरोबर रिअल फेस टाइम गाइड करणार आहे. याविषयी सनीने सांगितले की, ‘माझ्या डोक्यात या सर्व गोष्टी बºयाच काळापासून येत आहेत. वास्तविक मी स्वत: मेकअप खरेदी करताना खूप गोंधळून जाते. कोणती लिपस्टिक, कोणता शेड आणि कोणती आय लाइनर माझ्या चेहºयाला सुट करेल याविषयी माझ्या मनात खूप गोंधळ असतो. वास्तविक ही केवळ माझीच समस्या नसून, तमाम तरुणींची आहे. यावर उपाय शोधण्यासाठी मी हे अ‍ॅप्लीकेशन लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून तरुणींना मेकअपशी संबंधित प्रत्येक माहिती आणि टिप्स दिली जाणार आहे. 

दरम्यान, सनीच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, सध्या ती साउथ इंडियन चित्रपटांमध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. इमेज बदलण्यासाठीच तिने साउथ इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्याचबरोबर सनी स्वत:च्या बायोपिकवरही काम करीत आहे. लवकरच ती तिच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 
Web Title: Sunny Leone to give tips to girls!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.