आई सनीकडे जाताच खुदूखुदू हसायला लागली चिमुकली निशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:00 PM2019-01-22T18:00:00+5:302019-01-22T18:00:02+5:30

अलीकडेच सनी पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरसोबत दिसली. यादरम्यान निशा मम्मी-पप्पा दोघांचा हात धरून चालताना दिसली. पण अचानक निशा आईच्या कडेवर जाण्यासाठी रडू लागली. निशाला रडताना पाहून सनीने तिला कडेवर घेतले आणि मुलीला शांत केले.

Sunny Leone Daughter Nisha smiled as soon as she came to her | आई सनीकडे जाताच खुदूखुदू हसायला लागली चिमुकली निशा!

आई सनीकडे जाताच खुदूखुदू हसायला लागली चिमुकली निशा!

googlenewsNext

 बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजेच सनी लियोनी सध्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. तिला फॅमिलीसोबत वेळ घालवायला प्रचंड आवडते. ती कधी रेस्तराँमध्ये तर कधी इव्हेंटमध्ये फॅमिलीसोबत दिसते. अलीकडेच सनी पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरसोबत दिसली. यादरम्यान निशा मम्मी-पप्पा दोघांचा हात धरून चालताना दिसली. पण अचानक निशा आईच्या कडेवर जाण्यासाठी रडू लागली. निशाला रडताना पाहून सनीने तिला कडेवर घेतले आणि मुलीला शांत केले. सनीने कडेवर घेताच निशा गप्प झाली आणि खळखळून हसताना दिसली. सनी लियोनी तीन मुलांची आई आहे. तिला एक मुलगी निशा आणि दोन मुले नोह आणि असहर आहेत, ज्यांचा जन्म सेरोगेसीने झाला आहे.


सुत्रांनुसार, सनी लियोनीने ज्या मुलीला दत्तक घेतले होते तिला त्याआधी ११पेरेंट्सने दत्तक घ्यायला नकार दिला होता. हैराण करण्यासारखी गोष्ट ही आहे की, पेरेंट्सने त्या मुलीला तिच्या सावळ्या वर्णामुळे नाकारले होते. मुलांना दत्तक घेणारी चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजेंसीचे सीईओ, लेफ्टनंट कर्नल दीपक कुमारने या गोष्टीचा खुलासा केला होता.

ते म्हणाले होते, ‘अनेक कुटुंबाच्या मुलांचा रंग, चेहरा आणि त्याची मेडिकल हिस्ट्री जाणून घ्यायला उत्सुक असतात आणि यावरूनच ते मुलाला स्विकारायचे की, नाकारायचे हे ठरवतात. याचमुळे निशाला ११ कुटूंबांनी दत्तक घ्यायला नकार दिला होता. सनी आणि तिचा पती डॅनियलने या सर्व गोष्टीत जास्त रस दाखवला नाही. सनीने मुलीचे बॅकग्राउंड, रंग, मेडिकल हिस्ट्री अशा गोष्टींची पर्वा न करता तिला दत्तक घेतले. सनीने इतरांप्रमाणेच रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची वाट पहिली. आम्ही याचा आदर करतो की, तिने नियम न तोडता सर्व फॉर्मेलिटीज पूर्ण केल्या.  

Web Title: Sunny Leone Daughter Nisha smiled as soon as she came to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.