Sunny Deol received inspiration; IPS officer becomes police constable quit! | सनी देओलकडून मिळाली प्रेरणा; पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडून देत बनला आयपीएस!

मनोज कुमार रावत यांनी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएसी ( UPSC Civil Services Examination 2017) परीक्षेत देशात ८२४ वी रॅँक मिळविली. आता मनोज कुमार लवकरच आयपीएस अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. २९ वर्षीय मनोज सुरुवातीला एक पोलीस कॉन्स्ट्रेबल म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१३ मध्ये ही नोकरी सोडून दिली. कारण लहानपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. 

यावेळी मनोज सांगतात की, मी एक सर्वसामान्य परिवारातून आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच हे जाणून होतो की, मला संधींचा शोध घ्यायचा आहे. याचदरम्यान, माझ्या भावानंतर मलाही पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर मी निर्धार केला की, मला पुढे जायचे आहे. मी नागरी सेवा परीक्षा दिल्या. पुढे २०१४ मध्ये मला कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर सीआयएसएफमध्ये नोकरी मिळाली. ही नोकरीदेखील मी सोडली. त्यानंतर मी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. 
 

याविषयी मनोज सांगतात की, पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडल्यानंतर मला २०१४ मध्ये कनिष्ठ लिपिकाची नोकरी मिळाली. याचदरम्यान माझी सीआयएसएफमध्ये निवड झाली. मात्र मी हीदेखील नोकरी सोडली. कारण मला यूपीएससीसाठी पुरेसा वेळ हवा होता. मनोज रावत सांगतात की, यूपीएससीची तयारी करताना मी अभिनेता सनी देओल याच्यापासून खूपच प्रेरित होतो. जेव्हा मी सनी देओलचा ‘इंडियन’ हा चित्रपट बघितला तेव्हाच माझ्या मनात आयपीएस बनण्याची इच्छा निर्माण झाली.
Web Title: Sunny Deol received inspiration; IPS officer becomes police constable quit!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.