Sunil Shetty's father, who earned a hundred crore in the year, washed the pot in the hotel, read his struggle story! | वर्षात शंभर कोटी कमाविणाऱ्या सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, वाचा त्याची संघर्ष कथा!

९० च्या दशकात बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याने इंडस्ट्रीत एक अ‍ॅक्शन अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. सुनीलचा अ‍ॅक्शन अंदाज चाहत्यांना असा काही भावत होता की, लोक सिनेमागृहात अक्षरश: गर्दी करायचे. पुढे ‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटातून, त्याने स्वत:ला कॉमेडी अभिनेत्यांच्या रांगेत नेऊन बसविले. सुनील शेट्टी आतापर्यंत जवळपास ११० चित्रपटांमध्ये काम केले. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जेंटलमॅन’ चित्रपटात तो कर्नलच्या भूमिकेत बघावयास मिळाला. वास्तविक सुनील शेट्टी त्या मोजक्याच कलाकारांपैकी एक आहे, ज्यांचे कुठलेही फिल्मी बॅकग्राउंड नाही. त्याचे वडील हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचे. मात्र अशातही स्ट्रगल करून त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. आज सुनील वर्षाकाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कमावितो. 

सुनील शेट्टी सध्या इंडस्ट्रीमध्ये फारसा सक्रिय नाही. तो मोजक्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांना बघावयास मिळत आहे. परंतु अशातही त्याचा व्यवसाय ऐवढा आहे की, वर्षाकाठी त्याची कमाई शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र आज त्याच्याकडे दिसत असलेले वैभव एवढ्या सहजासहजी प्राप्त झाले नाही. याकरिता त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एका मुलाखतीत सुनीलने सांगितले की, त्याचे वडील हॉटेलमध्ये प्लेट धुण्याचे काम करीत होते. २०१३ मध्ये त्याच्या नव्या डेकोरेशन शोरूमला लॉन्च करताना त्याने म्हटले होते की, ‘ही तीच जागा आहे, ज्याठिकाणी माझे वडील वीरप्पा शेट्टी काम करायचे. माझ्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट करून त्यांनी १९४३ मध्ये एक बिल्डिंग खरेदी केली होती. ही बिल्डिंग वरळी येथे फोर सीजन हॉटेलच्या शेजारी आजही उभी आहे.’पुढे बोलताना सुनीलने सांगितले होते की, ‘माझ्या वडिलांचे कष्ट मी खूप जवळून बघितले आहेत. ते धान्य भरायच्या गोणीवर झोपायचे. त्यांनी आम्हाला अतिशय हालाखीच्या परिस्थितीत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला.’ आज सुनील शेट्टी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. खंडाळा येथे त्याचे ६२०० स्केअर फुटाचे लॅव्हिश फार्म हाऊस आहे. खंडाळा येथे असलेल्या या लक्झरी होम्सच्या आर्किटेक्टचे काम जॉन अब्राहमचा भाऊ एलन याने केले. या ६२०० स्के.फुटात पसरलेल्या लक्झरी हाउसमध्ये एक प्रायव्हेड गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइटचे लिव्हिंग रूम, पाच बेडरूम, किचन आहे. याचा हायलाइट पॉइंट डायनिंग रूम असून, त्याचे बांधकाम पुलाजवळच आहे. 

त्याचबरोबर मुंबईतील पॉश परिसरात त्याचे ‘एच २०’ नावाचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. हे रेस्टॉरंट केवळ सेलिब्रिटींमध्येच नव्हे तर सर्वसामान्य लोकांमध्येही फेमस आहेत. याव्यतिरिक्त साउथमध्येही त्याचे रेस्टॉरंट आहेत. जे तेथील स्पेशल डिशसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच सुनील शेट्टीचे स्वत:चे बुटिक आहे. सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी त्याचा हा बिझनेस सांभाळते. सुनीलच्या मते, बिझनेस त्याच्या डीएनएमध्ये आहे. आम्ही हॉटेल बॅकग्राउंडमधून आहोत. तसेच मेहनत करणे हे आम्हाला सुरुवातीपासूनच शिकविले आहे. त्यामुळे आम्ही या व्यवसायात आहोत, असेही त्याने सांगिलते. 
Web Title: Sunil Shetty's father, who earned a hundred crore in the year, washed the pot in the hotel, read his struggle story!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.