Sunil Shetty's daughter Athiya Shetty falls in love with 'Y' | सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी पडली 'या'च्या प्रेमात..

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या बी टाऊनमध्ये चर्चेत आहेत. आथिया  तिच्या पाहिल्या चित्रपटातूनमधून जेवढी प्रसिद्ध नाही झाली तेवढी ती तिच्या अफेरला घेऊन चर्चेत राहाते. सुनील शेट्टीच्या मुलीच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा आहे.  अथियाच्या आयुष्यात एका कॅनेडियन रॅपरची एंट्री झाली आहे. ज्यानंतर दोघांच्या अफेअरची खूप चर्चा होते आहे. अथिया या रॅपरच्या प्रेमात पुरती बुडाली आहे. या कॅनेडियन रॅपरचे नाव ड्रेक आहे.    

आता अथिया तर देशी आहे मग हे कसे झाले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल त्याचे झाले असे की काही दिवसांपूर्वी अथिया लंडनला गेली होती आणि तिथे तिची भेट ड्रेकशी झाली.ज्या हॉटेलमध्ये अथिया थांबली होती तिथे पॉप्युलर रॅपर ड्रेक सुद्धा थांबला होता. ड्रेक बघताच क्षणी अथियाच्या प्रेमात पडला.  अथियाच्या स्टायलिश अंदाजावर तो फिदा झाला. त्यांने अथियाबाबत माहिती काढली आणि मग तिला भेटला. यानंतर अनेकवेळा दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवू लागले. हळूहळू सुनील शेट्टीच्या लाडक्या मुलीला म्हणजेच अथियाला सुद्धा ड्रेक आवडू लागला. 

सध्या आथिया मुंबईत परत आली असून ते अजून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात आहेत.  ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. आता यात नात्यामध्ये कितपथ तथ्य आहे हे केवळ दोघेच सांगू शकतील. मात्र ही बातमी जर खरचं असेल तर सुनील शेट्टी आपल्या कॅनेडियन रॅपर जावयाला स्वीकारणार का ?, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काही महिन्यांपूर्वी अथिया अर्जुन कपूरसोबत मुबारकाँ चित्रपटात झळकली होती. यातील दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना आवडली होती. हा एक कॉमेडी चित्रपट होता. ज्यात पहिल्यांदा अर्जुन कपूरने आपला काका अनिल कपूरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केले होते. हा एका कम्पिलिट ‘फॅमिली एंटरटेनर’ चित्रपट होता.  
आथियाने आपल्या करिअरची सुरुवात निखिल अडवाणीच्या हिरो चित्रपटातून केली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. म्हणावे तसे यश अथियाला अजून मिळालेले नाही. 

ALSO READ : वर्षात शंभर कोटी कमाविणाऱ्या सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये धुवायचे भांडी, वाचा त्याची संघर्ष कथा!
Web Title: Sunil Shetty's daughter Athiya Shetty falls in love with 'Y'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.