Sultan has earned 40 crores on the very first day | सुलतानने पहिल्याच दिवशी कमवले 40 करोड

सुलतान या सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 करोडची कमाई केली आहे. सलमानच्या या चित्रपटाची घौडदौड अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट पहिल्या पाच दिवसांत म्हणजेच रविवारपर्यंत 150 करोडचा आकडा पार करेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ईद गुरुवारी साजरी होत असल्याने या दिवशी तर सगळ्याच चित्रपटगृहात सुलतान हाऊसफुल असेल अशी आशा वर्तवली जात आहे. सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असल्या तरी सलमानमुळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत असल्याचे अनेक डिस्टिब्युटर्सचे मत आहे. मुंबई या शहरासोबतच दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यात या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळालेली आहे. सुलतान हा चित्रपट भारतातील 4350 चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने पीके, धुम3, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शाहरुख खानच्या हॅपी न्यू ईयर या चित्रपटाने आतापर्यंत पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त व्यवसाय केला आहे. हॅपी न्यू ईयरनंतर सुलतान हा पहिल्या दिवशी सर्वाधिक व्यवसाय करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. 
Web Title: Sultan has earned 40 crores on the very first day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.