'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 05:05 PM2019-04-30T17:05:56+5:302019-04-30T17:10:14+5:30

'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं टायगर श्रॉफ आणि आलिया भटचे नावं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हुकअप साँगमध्ये आलिया आणि टायगरची केमिस्ट्री दिसतेय.

Student Of The Year 2's Hook Up Song out | 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्देहुकअप साँगची युट्यूबवर सध्या चांगलीच धूम आहेलोकांच्या हे साँग चांगलेच पसंतीस उतरले आहे

'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं टायगर श्रॉफ आणि आलिया भटचे नावं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हुकअप साँगमध्ये आलिया आणि टायगरची केमिस्ट्री दिसतेय. हुकअप साँगची युट्यूबवर सध्या चांगलीच धूम आहे. नेहा कक्कड आणि शेखर रावजियानीने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. लोकांच्या हे साँग चांगलेच पसंतीस उतरले आहे.  याआधी रिलीज झालेल्या 'मुंबई दिल्ली दी कुड़ियां' हे गाणं प्रेक्षकांना आवडले होते. 

आलिया भट सोबत पहिल्यांदाच टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल टायगरने सांगितले की, 'खूप छान अनुभव होता. जेव्हा करण सरांनी आलिया भटसोबत गाणे करायचे असल्याचे मला सांगितले. त्यावेळी मी खूपच उत्सुक झालो. कारण मी तिचा चाहता आहे. परंतु तिच्यासोबत काम करणे खूप चॅलेंजिंग होते. कारण तिचा प्रत्येक शॉट परफेक्ट होता. त्यामुळे मलादेखील शंभर टक्के द्यावे लागला. तिच्यासोबतचे काम खूप छान झाले आहे.'

या चित्रपटाबाबत टायगर खूप उत्सुक असून तो म्हणाला की, ''स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातील कलाकारांचेदेखील खूप कौतूक झाले होते. त्यामुळे  आता या चित्रपटाच्या सीक्वेलला रसिक कसा रिस्पॉन्स देतात, हे पाहावे लागेल. त्यामुळे स्टुडंट ऑफ द ईयर २ बाबत मी खूप उत्सुक आणि नर्व्हसदेखील आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २' हे एक वेगळे जग आहे. पहिल्या भागात पाहिलेले कॉलेज तुम्हाला पहायला मिळणार आहे. कथानक, पात्र व स्पोर्ट्स वेगळे पहायला मिळणार आहे.
 

Web Title: Student Of The Year 2's Hook Up Song out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.