The story of 'Dabang3' The story was leaked even before the shooting started !! | अशी असेल ‘दबंग3’ची कथा! शूटींग सुरू होण्याआधीच कहाणी झाली लीक!!

सुमारे आठ वर्षांपूर्वी सलमान खानने एक भूमिका साकारली होती. आजही ती सिनेप्रेमींच्या लक्षात आहे. केवळ लक्षात नाही तर सलमानच्या या भूमिकेची क्रेज अद्यापही कायम आहे. ही भूमिका कुठली तर चुलबुल पांडेची. ‘दबंग’ या चित्रपटातील सलमानची ही भूमिका यादगार भूमिकांपैकी एक आहे. या भूमिकेने सलमानला केवळ ‘दबंग’बनवले नाही तर चुलबुल पांडे ही ओळखही त्याला दिली. ‘दबंग’ इतका हिट झाला की, याचा दुसरा पार्ट ‘दबंग2’ आला आणि आता तिसरा पार्ट अर्थात ‘दबंग3’ आणण्याची तयारी सुरू झाली आहे. अर्थात हा तिसरा पार्ट येण्याआधीच याच्या मेकर्सला एक मोठा धक्का बसला आहे.
होय, चित्रपटाचे शूटींग सुरु होण्याआधीच याची संपूर्ण कथा लीक झाली आहे. २०१० मध्ये ‘दबंग’ आला होता. यात सलमानने चुलबुल पांडेची भूमिका साकारली होती. तिस-या पार्टमध्येही सलमानची व्यक्तिरेखा चुलबुल पांडेसारखीच असणार आहे. पण त्याच्या या व्यक्तिरेखेत एका रिअल लाईफ पोलिस अधिका-याच्या आयुष्यातील काही क्षण असतील.  होय, नोएडाचा हा पोलिस अधिकारी काही वर्षांपूर्वी एका केसमुळे प्रकाशझोतात आला होता. या केसमध्ये एका राजकीय नेत्याचे नावही समोर आले होते. याच नोएडाच्या पोलिस अधिका-याची भूमिका सलमान यात साकारताना दिसणार आहे.  यात सलमानच्या पात्राचे नाव काय असेल, हे कळले नाही. पण त्याची बदली नोएडात होते आणि पुढे तो आपल्या ‘दबंगगिरी’ने अनेकांना वठणीवर आणतो, असे याचे कथानक असल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर सलमानला ही कथा इतकी आवडली की, त्याने ऐकताक्षणीच त्याला होकार दिला. 

ALSO READ :SEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागला ! ‘या’ मराठी सुपरस्टारच्या मुलीला करणार ‘दबंग3’मधून लॉन्च!!

‘दबंग3’  या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ‘रज्जो’चे पात्र साकारताना दिसेल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यंदा जूनपासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे. अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी मांजरेकर ‘दबंग3’मधून बॉलिवूड डेब्यू करतेय.
Web Title: The story of 'Dabang3' The story was leaked even before the shooting started !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.