-रवींद्र मोरे 
बॉलिवूड स्टार्स आपल्या एका चित्रपटातून करोडो रुपये कमवतात. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता नसते. मात्र एवढ्या कमाईनंतरही काही असे दिग्गज स्टार्स आहेत ज्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. आज अशाच काही स्टार्सबाबतचा हा वृत्तांत... 

* अमिताभ बच्चन 
Image result for amitabh bachchan
महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याजवळ आज कोणत्याच गोष्टींची कमतरता नाहीय. मात्र त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा त्यांची परिस्थिती रस्त्यावर येण्यासारखी झाली होती. २००० मध्ये बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, ‘जग नवे वर्ष २००० चे स्वागत मोठ्या हर्षोल्लोसाने करत आहेत आणि मी माझे आयुष्य संपण्याचा आनंद साजरा करत आहे.’ या दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याजवळ ना कोणता चित्रपट होता ना पैसा. विशेष म्हणजे याच वेळी त्यांची कंपनीदेखील डबघाईला आली होती. एवढेच नव्हे तर अमिताभ बऱ्याच कायदेशीर खटल्यातही अडक ले होते. सोबतच टॅक्स डिपार्टमेंटनेही रिकव्हरीसाठी त्यांचे घर देण्याचे ठरविले होते. मात्र काही वर्षानंतरच बिग बींना एक रिअ‍ॅलिटी शो मिळाला आणि शोच्या यशानंतर त्यांचे आयुष्य पुर्वरत झाले.   

* प्रीति झिंटा
Related image
‘कोई मिल गया’ चित्रपटातून प्रीति वर्ल्डवाइड फेमस झाली होती, मात्र ‘इश्क इन पॅरिस’ फ्लॉप झाल्यानंतर प्रीतिच्या आयुष्यात मोठी आर्थिक तंगी निर्माण झाली होती. त्याचवेळी लेखक आणि डायरेक्टर अब्बास टायरवाला यांनीही प्रीतिच्या विरोधात त्यांचे पैसे परत न दिल्यामुळे गुन्हा दाखल केला होता. अशावेळी सलमान खानने प्रीतिला आर्थिक मदत केली होती.  

* शाहरुख खान
Related image
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. २०१० मध्ये शाहरुखने ‘रा-वन’ चित्रपटावर खूपच पैसा लावला होता, मात्र हा चित्रपट सर्वात मोठा फ्लॉप ठरला. यावेळी शाहरुखला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. शाहरु खने स्वत: जाहीरही केले होते की, ‘रा-वन’ पैसा आणि वेळेचा मोठा अपव्यय होता.  
 
 * जॅकी श्रॉफ
Image result for jackie shroff
बॉलिवूडचा जग्गू दादा आजदेखील चित्रपटात काम करताना दिसत आहे. मात्र काही कारणास्तव जॅकी श्रॉफ आर्थिक अडचणीचा सामना करत होते. त्यांनी प्रोड्यूसर साजिद नाडियावाला यांच्याकडून कर्जापोटी मोठी रक्कम घेतली होती. याच प्रकरणामुळे साजिद कोर्टात जाणार होते मात्र सलमान खानने जॅकी श्रॉफ यांची आर्थिक मदत केली आणि साजिद यांना कोर्टात जाण्यापासून थांबविले. त्यानंतर जॅकी यांनी आपला एक फ्लॅट विकू न साजिदची संपूर्ण रक्कम परत केली.   

* श्वेता प्रसाद
Image result for shweta prasad
‘मकडी’ चित्रपटाद्वो आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारी श्वेता प्रसाद बासु लहानपणापासूनच आर्थिक सुबत्तेत जगली आहे. मात्र २३ वर्षीय ही अभिनेत्री एका सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आली होती. आर्थिक अडचणीच्या कारणाने श्वेताला सेक्स रॅकेटचा सहारा घ्यावा लागला होता, असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. मात्र नंतर श्वेताने या गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवले. 
Web Title: The 'stars' came to the streets without any money!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.