This is Sridevi's last tweet! | हे आहे श्रीदेवींचे शेवटचे ट्विट!

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची  वेगळी ओळख निर्माण करणाºया श्रीदेवींचे शनिवारी रात्री निधन झालेत. भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी त्या दुबईत गेल्या होत्या. काही दिवसांपासून मोहितच्या लग्नाचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये श्रीदेवी  लहान मुलगी खुशी कपूरसोबत दिसल्या होत्या. त्या क्षणाला बॉलिवूडची ही ‘हवा हवाई’ काही तासांची पाहुणी आहे, अशी पुसटशी शंकाही कुणाच्या मनाला स्पर्शून गेली नसेल. प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण बॉलिवूड धक्क्यात आहे. बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी श्रीदेवी यांना  सोशल मीडियावर माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. खरे तर श्रीदेव आपल्यात नाहीत या गोष्टीवर   विश्वास बसणे अशक्य आहे मात्र हेच सत्य आहे. 
मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी शेवटचे ट्वीट केले आहे. श्रीदेवी यांनी एक ट्रिब्यूट व्हिडिओ  रिट्वीट केला होता. या व्हिडिओत कुंडली भाग्यची अभिनेत्री आर्या श्रीदेवी यांच्याच प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. श्रीदेवी या ट्रिब्यूट व्हिडिओला बघून खूप प्रभावित झाल्या होत्या आणि त्यांनी याचा व्हिडिओ रिट्वीट केला होता. 


जर तुम्ही श्रीदेवी यांचे ट्विटर अकाऊंट नीट बघाल तर हे ट्वीट तुम्हाला खाली दिसेल. सगळ्यात वर जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपट धडक चे पोस्टर पिन केलेले आहे. त्याखाली त्यांचे हे  ट्वीट आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर काहीच दिवसात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवी कपूरच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन त्या गत वर्षांपासून काहीशा चिंतेत होत्या. एका इंटरव्हू दरम्यान बोलताना त्यांनी हे सांगितले होते. एका बाजूला मी खूप आनंदित आहे तर एका बाजूला मला खूप भीती देखील वाटते आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
 
Web Title: This is Sridevi's last tweet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.