Sridevi's Lakh Janhavi Kapoor made her first photo shoot; Sighling Luke was seen in all the photos! | श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने केले पहिले फोटोशूट; सर्वच फोटोंमध्ये दिसला तिचा सिजलिंग लूक!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने नुकतेच एका फॅशन साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे. जान्हवीचे हे पहिलेच फोटोशूट आहे. याच साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, आई श्रीदेवी यांच्या निधनातून आम्ही अजूनही सावरलो नाही. मात्र या घटनेनंतर आमचा संपूर्ण परिवार एकत्र आला आहे. आम्ही एकमेकांना सपोर्ट करीत आहोत. जान्हवीने सांगितले की, मला माझ्या पालकांवर गर्व आहे. आता मला देखील असे काही करायचे आहे, जेणेकरून त्यांना माझ्यावर गर्व वाटावा. ‘मॉम’ मला सांगायची की, ‘तुला कशा प्रकारच्या भूमिका मिळतात हे महत्त्वाचे नाही. तू त्या भूमिकेतून कशा पद्धतीने छाप सोडतेस हे महत्त्वाचे आहे. हेच एका अभिनेत्याचे काम असते. दरम्यान, साप्ताहिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये जान्हवी खूपच सुंदर गॉर्जियस दिसत आहे. फोटोशूटच्या सर्वच फोटोंमध्ये तिचा सिजलिंग लूक बघावयास मिळत आहे. या साप्ताहिकाच्या जून महिन्याच्या अंकाच्या मुख्य पानासाठी जान्हवीने हे फोटोशूट केले आहे. साप्ताहिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये जान्हवी फ्लोरल प्रिंटच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. एका फोटोमध्ये मोठ्या सोफ्यावर जान्हवी बसलेली असून, यावेळी तिने फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर तिने जीन्सचे एक जॅकेटही कॅरी केले आहे. एका फोटोमध्ये तिने लाइट ग्रीन कलरचा हॉट ड्रेस परिधान केला आहे. या साप्ताहिकासाठी जान्हवीचे फोटोज् फोटोग्राफर प्रसाद नायक याने क्लिक केले आहेत. मेकअप सुभाष वागल आणि स्टाइल प्रियंका कपाडिया हिची आहे. जान्हवी कपूर लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत निर्मित याच चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करीत आहेत. हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Sridevi's Lakh Janhavi Kapoor made her first photo shoot; Sighling Luke was seen in all the photos!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.