Sridevi's daughter said that the hearts of young people would not be broken! | श्रीदेवीच्या मुलीने म्हटले असे काही की, तरुणांची मने तुटल्याशिवाय राहणार नाही!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली सध्या कुठल्या ना कुठल्या कारणांनी प्रचंड चर्चेत राहत आहेत. जान्हवी सध्या तिच्या ‘धडक’ या डेब्यू चित्रपटामुळे सातत्याने प्रसिद्धीझोतात येत आहे. तिचा हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर खुशी कपूर तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि खुशीचा एक क्यूट व्हिडीओ समोर आला होता. आता सोशल मीडियावर खुशीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ती मुलांसाठी असे काही सांगत आहे, ज्यामुळे त्यांचे मन तुटल्याशिवाय राहणार नाही. 

खुशी कपूरने फॅन क्लबमध्ये एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये खुशी तिच्या मित्रांना सांगतेय की, ‘मला कोण्याही मुलाबरोबर राहायचे नाही.’ मात्र खुशीचे एक्सप्रेशन्स बघून असे दिसून येते की, ती चेष्टामस्करीत हे सर्व बोलत असावी. आठवडाभरापूर्वी खुशी आणि जान्हवीचा एक क्यूट व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये जान्हवी आपल्या लहान बहिणीला किस्सी मागताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणतेय की, ‘मित्रांनो माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे.’ त्यानंतर तिच्या पाठीमागे उभी असलेली खुशी कॅमेºयात दिसते. खुशी येताच जान्हवीच्या चेहºयावर हास्य फुलते. ती तिला म्हणते की, ‘मला किस्सा दे.’ खुशी लगेचच तिच्या गालावर किस करते. व्हिडीओमध्ये दोघी बहिणींची केमिस्ट्री आणि बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येते. 

दरम्यान, वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले होते की, खुशी आईप्रमाणे तिची काळजी घेत आहे. गेल्यावर्षी दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवीने म्हटले होते की, माझी लहान मुलगी आपली जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहे. मात्र जान्हवीला सातत्याने अटेंशन हवे असते. याचाच उल्लेख करताना जान्हवीने वोगला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘खुशी माझ्यासाठी आईप्रमाणे आहे. मी अजूनही पूर्णपणे लहान मुलगीच आहे. त्यामुळे ती माझा सांभाळ करते. बºयाचदा तर ती मला झोपतेसुद्धा. 

Web Title: Sridevi's daughter said that the hearts of young people would not be broken!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.