Sridevi wanted to be in Nashik, handed over a check of eight lakh rupees for the house, but ...! | श्रीदेवीला व्हायचे होते नाशिककर, घरासाठी आठ लाखांचा धनादेशही केला होता सुपूर्द, पण...!

सतीश डोंगरे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिने वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडसह तमाम चाहत्यांना ‘सदमा’ बसला आहे. पुतण्याच्या लग्नासाठी परिवारासह दुबईला गेलेल्या श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. जेव्हा श्रीदेवीच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा अनेकांना यावर विश्वासच बसला नाही. श्रीदेवीने तिच्या चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केल्याने तिच्याशी संबंधित अनेक आठवणी त्यांच्या हृदयाजवळ आहेत. श्रीदेवीचे नाशिकशी देखील एक अतुट नाते होते. होय, श्रीदेवीला नाशिककर व्हायचे होते. पण अचानक एक्झिटमुळे श्रीदेवीचे स्वप्न अधुरेच राहिले. 

२७ मे २०१३ रोजी श्रीदेवीने आणि पती बोनी कपूरसोबत नाशिकमधील एका नामांकित कंपनीच्या हाउसिंग प्रकल्पाला भेट दिली होती. यावेळी अभिनेता मिलिंद गुणाजी हादेखील उपस्थित होते. श्रीदेवीला नाशिकचे निसर्गरम्य वातावरण खूपच भावले होते. त्यामुळे त्याचवेळी श्रीदेवीने नाशिककर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे याच प्रकल्पात एक घर बुकिंग करण्यासाठी आठ लाख रूपयांचा धनादेश देखील कंपनीच्या पदाधिकाºयांकडे तिने सुपूर्द केला होता. त्यामुळे श्रीदेवी लवकरच नाशिककर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. विशेष म्हणजे जेव्हा ही बाब समोर आली होती, तेव्हा नाशिककरांचाही उर अभिमानाने भरून आला होता. मात्र अचानकच श्रीदेवीच्या निधनाची बातमी समोर आल्याने नाशिककरांना धक्का बसला आहे. या दुदैवी घटनेमुळे श्रीदेवीचे नाशिकमधील घराचे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये अलिशान बंगले असलेले बरेचसे कलाकार सध्या सेकंड होम म्हणून नाशिकला पसंती देत आहेत. धार्मिकतेबरोबरच औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया नाशिककडे कलाकारांचा कल वाढत आहे. येथील निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक वातारण कलाकारांना खुणावत असल्यानेच बरेचसे कलाकार याठिकाणी घर खरेदी करीत आहेत. 
Web Title: Sridevi wanted to be in Nashik, handed over a check of eight lakh rupees for the house, but ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.