Sridevi refused to work with Bollywood superstar Amitabh Bachchan | श्रीदेवीने बॉलीवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन सोबत काम करायला दिला होता नकार

बॉलीवूड मध्ये नायक प्रधानच चित्रपट आपल्याला अधिकाधिक पाहायला मिळतात. पण श्रीदेवी ने तिच्या कारकिर्दीत अधिकाधिक नायिका प्रधान चित्रपटात काम केले. आणि हे सगळेच चित्रपट हिट झाले.
सदमा, चालबाज, लमहे यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. या सगळ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या सगळ्याच चित्रपटातील अभिनयासाठी तिचे कौतुक करण्यात आले. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीदेवीने नगीना या चित्रपटानंतर अनेक नायिका प्रधान चित्रपट केले. त्याकाळात देखील अमिताभ बच्चन हे सुपरस्टार होते. या सुपरस्टार सोबत काम करण्यास श्रीदेवीने नकार दिला होता. चित्रपटात केवळ नायकासोबत गाणी गाण्यात आणि डान्स करण्यात तिला रस नव्हता. चित्रपटात नायिकेची भूमिका चांगली असेल तरच काम करणार असेच तिने ठरवले होते. त्यामुळे तिने अमिताभ यांच्या सोबतचा चित्रपट देखील स्वीकारला नाही. अनेक वर्षांनी तिने अमिताभ सोबत खुदा गवाह या चित्रपटात काम केले. या चित्रपटात अमिताभ यांच्या इतकीच श्रीदेवीची भूमिका ताकदीची होती.
‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Also Read : श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि बेशुद्ध झाल्यात...!
Web Title: Sridevi refused to work with Bollywood superstar Amitabh Bachchan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.