Sridevi looks like hiding lips! Lip job or anything else? | ​सुजलेले ओठ लपवताना दिसली श्रीदेवी! लिप जॉब की आणखी काही?

श्रीदेवी बॉलिवूडची एक आकर्षक अभिनेत्री आहे, यात शंका नाही. अलीकडे आलेल्या ‘मॉम’ या चित्रपटात स्वत:इतकाच आकर्षक अभिनय करणारी श्रीदेवी काल-परवा अनुराग बासूने आयोजित केलेल्या सरस्वती पूजेला पोहोचली. खरे तर अनुराग बासूच्या या सरस्वती पूजनाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती श्रीदेवीची. कारणही तसेच होते. यावेळी श्रीदेवी बरीच बदलेली दिसली. केवळ बदललेलीच नाही तर काहीतरी लपवतांनाही दिसली. काय? तर ओठ. होय, श्रीदेवीचे ओठ सुजलेले दिसले. हेच सुजलेल्या ओठ श्रीदेवी लपवतांना दिसली.

 श्रीदेवीने  कधीचीच  वयाची पन्नाशी ओलांडलीय. पण आजही तिच्या वयापेक्षा ती बरीच तरूण दिसते. तरूण दिसण्यासाठी श्रीदेवीने प्लास्टिक सर्जरी केल्याचे मानले जाते. अलीकडे एका इव्हेंटमध्ये श्रीदेवीला याबद्दल थेट प्रश्न विचारला गेला होता. अर्थातच श्रीदेवीने प्लास्टिक सर्जरी चर्चा अफवा असल्याचे सांगितले होते. मी आधीपासूनच तरूण दिसते. लोकांना इतक्यात माझे तरूण दिसणे जाणवू लागलेय. कारण अलीकडे मी बाहेर पडू लागलेय. मनाची शांती आणि आनंद हे माझ्या तरूण दिसण्याचे रहस्य आहे. मी अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगत आलेय. आजही मी रोज कडक डाएट फॉलो करते. न चुकता पॉवर योगा करते. आठवड्यातले चार दिवस टेनिस खेळते. जंक फूड, गोड पदार्थ मी अजिबात खात नाही. हे सगळे माझ्या चेहºयावर दिसते, असे ती म्हणाली होती.

ALSO READ : ​अभिनेत्रीचं नाही तर उत्तम चित्रकारही आहे श्रीदेवी ! या दोन चित्रांचा होणार लिलाव!!

आता श्रीदेवी म्हणते, त्यात १०० टक्के तथ्य आहे. पण म्हणून श्रीदेवीने तरूण दिसण्यासाठी सर्जरीचा आधार घेतलाच नाही, असे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरेल. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी श्रीदेवीने नाकावर सर्जरी केल्याचे मानले जाते. तिचे जुने आणि आत्ताचे फोटो याचा पुरावा आहेत. काल परवाचे तिचे सुजलेले ओठही तिच्या लिप जॉबकडे इशारा करतात.  आता खरे काय नि खोटे काय, हे श्रीदेवीलाच ठाऊक़ आम्ही केवळ तिचे ताजे फोटो घेऊन आलो आहोत. ते पाहा आणि तुम्हीच काय ते ठरवा!
Web Title: Sridevi looks like hiding lips! Lip job or anything else?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.