Sridevi had planned, Jana's Birthday to be celebrated today! | ​श्रीदेवींनी जसा प्लान केला होता, आज अगदी तसाचं साजरा होणार जान्हवीचा वाढदिवस!

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिचा आज (६ मार्च) वाढदिवस. आज जान्हवी २१ वर्षांची झाली. दरवर्षी जान्हवीची अम्मा श्रीदेवी लेकीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरी करायची. जान्हवीच्या २१ व्या वाढदिवसासाठीही अम्माने खास प्लान केला होता. पण त्याआधीच जान्हवीची अम्मा जगाला सोडून गेली. त्यामुळे जान्हवीच्या या वाढदिवसाला अम्मा नसणार आहे. अम्माच्या निधनाने जान्हवी किती दु:खी असेल, याची कल्पना आपण करू शकतोच. अम्माशिवाय वाढदिवस साजरा करण्यास जान्हवीचे मनही राजी नसावे. पण कपूर कुटुंबाने मात्र जान्हवीच्या वाढदिवसासाठी एक खास प्लान बनवला आहे. होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांनी आखलेल्या प्लाननुसारच जान्हवीचा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यानुसार, संपूर्ण कपूर कुटुंब आज डिनरला जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवींनी जान्हवीच्या बर्थ डेसाठी काही खास प्लान केला होता. पती बोनी कपूर यांच्यासोबत त्यांनी हा प्लान शेअर केला होता. पण हा प्लान अमलात आणण्याआधीच श्रीदेवी अचानक सर्वांना अलविदा म्हणून जगातून निघून गेल्या. त्यांचा प्लान आता बोनी कपूर पूर्ण करणार आहेत. आपल्या वाढदिवशी जान्हवी आनंदी राहावी, असे बोनी व कपूर कुटुंबाला वाटते आहे. त्यानुसार,अख्खे कपूर कुटुंब डिनरला जाणार आहे. जान्हवीची सावत्र बहीण अंशुला कपूर ही सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सामील होणार आहे.सोनम कपूर, मनीष मल्होत्राने केले बर्थ डे विश
जान्हवीचा यंदाचा वाढदिवस केवळ तिच्यासाठीचं नाही तर कपूर कुटुंबासह त्यांच्या जवळच्या मित्रांसाठीही प्रचंड हळवा करणारा क्षण आहे. त्यामुळे जान्हवीला सांभाळण्याचा सर्वांचा आटोकाट प्रयत्न आहे.  चुलत बहीण सोनम कपूर, कपूर कुटुंबाचा अतिशय जवळचा मित्र व फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीला विश केले आहे. सोनमने जान्हवीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तू माझ्यापेक्षाही स्ट्राँग आहे, हॅपी  बर्थ डे जानू, असे सोनमने लिहिले आहे. मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीला बर्थ डे विश करताना तिला जगातील सगळा आनंद, प्रेम, शांती मिळो, अशी कामना केली आहे.
लवकरच जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रिलीज होतो आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी बॉलिवूड डेब्यू करते आहे.
Web Title: Sridevi had planned, Jana's Birthday to be celebrated today!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.