Sridevi Funeral: Official information given by the Kapoor family to Shree Devi's funeral and mourning! | Sridevi Funeral : कपूर परिवाराने श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेची दिली अधिकृत माहिती!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या परिवाराकडून मंगळवारी एक अधिकृत स्टेटमेंट करताना या दु:खद क्षणी सहकार्य केल्याबद्दल माध्यमांचे आभार मानले. खुशी, जान्हवी, बोनी कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर आणि अयप्पन परिवाराने या भावुकक्षणी मीडियाच्या संवेदना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. या अधिकृत स्टेटमेंटनुसार, श्रीदेवी यांची शोकसभा बुधवारी मुंबईतील अंधेरी येथे सकाळी ९.३० ते १२.३० वाजेदरम्यान होणार आहे. तर श्रीदेवी यांची अंतिमयात्रा बुधवारीच मुंबईतील विलेपार्ले येथून दुपारी ३.३० वाजेदरम्यान सुरू होणार आहे. 

श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत भारतात आणले जाण्याची अपेक्षा आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव उद्योगपती अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने आणले जात आहे. दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूचा तपास मंगळवारी पूर्ण केला. त्यानंतर दुबई पब्लिक प्रॉसिक्यूटर यांनी श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले. ६.३० वाजेच्या दरम्यान पार्थिव दुबई विमानतळावर आणण्यात आले होते. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, शनिवारी दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. पोस्टमार्टमच्या रिपोर्टममध्ये हे स्पष्ट झाले होते की, श्रीदेवी बेशुद्ध होऊन बाथटबमध्ये पडल्या होत्या. ज्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला. यावेळी श्रीदेवी यांच्या रक्तात दारूचे अंश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर बनले. शिवाय दुबई पब्लिक प्रॉसिक्यूशनकडे सोपविल्यामुळे त्याचा सखोल तपास करण्यात आला. आता दुबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबविला असून, श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या परिवाराकडे सोपविले आहे. 
Web Title: Sridevi Funeral: Official information given by the Kapoor family to Shree Devi's funeral and mourning!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.