अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ वर्षी निधन झाले. श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर पुतण्या मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबई येथे गेली होती. श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७ मध्ये श्रीदेवीला बॉलिवूडमध्ये ५० वर्ष पूर्ण झाले होते. १९६७ मध्ये केवळ वयाच्या चवथ्या वर्षी ‘थुनइवन’ या तामिळ चित्रपटातून श्रीदेवीने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. श्रीदेवी यांच्या ५० वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये अशा बºयाचशा घटना घडल्या ज्या रंजक आहेत. असाच एक किस्सा आम्ही यानिमित्त सांगणार आहोत. जेव्हा ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानकच अभिनेता संजय दत्त श्रीदेवीच्या हॉटेलमधील रूममध्ये पोहोचला अन् जोरजोरात दरवाजा ठोकत होता. जेव्हा श्रीदेवीने दरवाजा उघडला तेव्हा संजय दत्त प्रचंड नशेत होता. संजूबाबाला या अवतारात बघून श्रीदेवी प्रचंड घाबरली होती. संजय याच अवस्थेत श्रीदेवीच्या रूममध्ये गेला. वास्तविक त्यावेळी संजय दत्त श्रीदेवीचा खूप मोठा चाहता होता. जेव्हा त्याला श्रीदेवी आणि जितेंद्र ‘हिम्मतावाला’ या चित्रपटाची शूटिंगसाठीहॉटेलमध्ये आले आहेत हे समजले तेव्हा तो श्रीदेवीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र संजूबाबाने त्यावेळी प्रचंड नशा केली असल्याने श्रीदेवी प्रचंड घाबरून गेली होती. एका मुलाखतीत संजूबाबने याविषयी सांगितले होते की, श्रीदेवीच्या रूममध्ये पोहोचल्यानंतर मी तिला काय बोललो अन् कशाप्रकारचा वागलो हे मला आजही आठवत नाही. मात्र या घटनेनंतर ती खूप घाबरली होती. तिने भितीपोटी दरवाजा बंद केला होता. संजय दत्त आणि श्रीदेवीची ही पहिलीच भेट होती. परंतु श्रीदेवीसाठी ही भेट एवढी वाइट होती की, पुढे संजय दत्तसोबत कुठलाच चित्रपट करायचा नाही असा तिने निर्णय घेतला होता. १९८० मध्ये जेव्हा श्रीदेवीने ‘जमीन’ चित्रपट साइन केला होता तेव्हा तिने स्पष्ट शब्दात सांगितले होते की, संजय दत्तसोबत एकही सीन करणार नाही. वास्तविक श्रीदेवीने हा चित्रपट हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेअगोदरच साइन केला होता. या चित्रपटात संजय दत्त व्यतिरिक्त विनोद खन्ना आणि रजनीकांत यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. वास्तविक हा चित्रपट अखेरपर्यंत रिलीज होवू शकला नाही. वृत्तानुसार, १९९२ मध्ये आलेल्या ‘खुदा गवाह’ या चित्रपटासाठी अगोदर संजय दत्त आणि फरहा यांचे नाव पुढे आले होते. मात्र पुढे दोघांनीही ऐनवेळी चित्रपट सोडला. असे म्हटले जाते की, या चित्रपटातील काही सीन संजय दत्त आणि श्रीदेवी यांच्यात चित्रित केले जाणार होते. मात्र संजय दत्त सेटवर खूपच अनकम्फर्टेबल राहत होता. अखेर त्याने हा चित्रपट सोडला. 
Web Title: Sridevi decided not to work with Sanjay Dutt; Because it was!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.