Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:13 PM2019-02-22T18:13:29+5:302019-02-22T18:22:41+5:30

श्रीदेवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत.

Sridevi Death Anniversary : Sridevi's last Instagram pic with Boney and Khushi Kapoor goes viral on death anniversary | Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीदेवी या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगल्याच अॅक्टिव्ह होत्या. त्यानी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा सगळ्यात शेवटचा फोटो असून या फोटोत त्या खूपच सुंदर दिसत असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.  

बॉलिवूडची हवा-हवाई, ख्वाबो की शहजादी अशा एक ना अनेक नावांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी होती. त्यांचा २४ फेब्रुवारीला पहिला स्मृती दिन आहे. वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृती दिनाला काही दिवस शिल्लक असताना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

श्रीदेवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. श्रीदेवी या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगल्याच अॅक्टिव्ह होत्या. त्यानी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा सगळ्यात शेवटचा फोटो असून या फोटोत त्या खूपच सुंदर दिसत असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.  

श्रीदेवी मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या वर्षी दुबईला गेल्या होत्या, त्यावेळी हा फोटो काढण्यात आलेला होता. लग्नासाठी दुबईला असताना त्या जुमैरा एमिरेट्स टॉवरमध्ये राहात होत्या. याच हॉटेलमधील वॉशरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर डिनरला बाहेर जाणार असल्याने त्या आवरायला वॉशरूमला गेल्या होत्या. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला असता पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी त्यांना दिसल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली होती. ही बातमी प्रसारमाध्यमात आल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनाला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.  

Web Title: Sridevi Death Anniversary : Sridevi's last Instagram pic with Boney and Khushi Kapoor goes viral on death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.