शुक्रवारी रात्री शाहीद कपूरची पत्नी मीरा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आज रविवारी मीराला रूग्णालयातून सुटी झाली. शाहीद स्वत: आपल्या लहानशा परीला घरी घेऊन आला. ही नन्ही परी म्हणजे शाहीद व मीराच्या काळजाचा तुकडा.  या काळजाच्या तुकड्याला छातीशी कवटाळून शाहीद रूग्णालयातून बाहेर पडला. मीरा समोर आणि शाहीद आपल्या बेटीला घेऊन मागे असे तिघेही घरी पोहोचले. याचदरम्यान पावसाचे थेंब लागले. लगेच कुणीतरी शाहीदच्या डोक्यावर छत्री धरली आणि शाहीदची चिमुकली पापासोबत घरी आली. याचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पर्यायाने शाहीद व मीराच्या बाळाचे हे पहिले फोटो आहेत. तेव्हा पाहा तर...!!

  


Web Title: Specially for you ... Shahid and Mirah's first photo of Mom!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.