South's 'beauty' Regina Kendrapala Bollywood Lottery! Sonam Kapoor's film debuts !! | ​ साऊथची ‘ब्युटी’ रेजिना कैसेन्द्राला बॉलिवूडची लॉटरी! सोनम कपूरच्या चित्रपटातून करणार डेब्यू!!

बॉलिवूडमध्ये आणखी एक नवा चेहरा येतोय. या चेह-याचे साऊथमध्ये हजारो-लाखो ‘दिवाने’ आहेत. येत्या काळात हा सुंदर चेहरा बॉलिवूड  प्रेक्षकांनाही वेड लावणार आहे. होय, साऊथची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री रेजिना कैसेन्द्रा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे.
रेजिनाने उण्यापु-या सोळाव्या वर्षी तामिळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘Kanda Naal Mudhal’ या चित्रपटाद्वारे तिने डेब्यू केला. या चित्रपटात ती तामिळ सुपरस्टार प्रसन्नासोबत दिसली होती. हीच रेजिना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून रेजिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे कळतेय. या चित्रपटात सोनम कपूरचे पापा अनिल कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजिनाला या चित्रपटासाठी साईन करण्यात आलेय. यात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.खरे तर रेजिनाने याआधीही एक बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘आंखे2’. महानायक अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अर्जुन रामपाल यांच्या उपस्थितीत ‘आंखे2’ची घोषणा करण्यात आली होती. पण तूर्तात हा चित्रपट थंडबस्त्यात टाकण्यात आल्याची चर्चा आहे. पहिलाच बॉलिवूड चित्रपट असा थंडबस्त्यात पडलेला पाहून रेजिना बरीच निराश झाली होती. पण आता ही निराशा दूर करण्याची दुसरी संधी तिला मिळाली आहे. त्यामुळे सध्या ती जाम आनंदात आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री हे प्रत्येक साऊथच्या अभिनेत्रीचे स्वप्न असते. मला ही संधी मिळाली, याचा मला आनंद आहे, असे ती म्हणाली.

ALSO READ : ​‘पॅडमॅन’नंतर सोनम कपूरने घेतलायं एक मोठा निर्णय! जाणून घ्या काय!!

चेन्नईत जन्मलेली आणि तिथेच वाढलेली रेजिना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाखांवर फॉलोअर्स आहेत. रेजिनाने आपल्या कारकिर्दीत बहुतांश तेलगू चित्रपट केलेत. एक चांगली डान्सर आणि सिंगर म्हणूनही तिची ख्याती आहे.
Web Title: South's 'beauty' Regina Kendrapala Bollywood Lottery! Sonam Kapoor's film debuts !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.