South superstar Maheshbaba will come to Bollywood! 'This' film will be debuted !! | ​साऊथ सुपरस्टार महेशबाबू बॉलिवूडमध्ये येणार! ‘या’ चित्रपटातून होणार डेब्यू!!

तेलगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेशबाबू आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, महेशबाबूच्या बॉलिवूड डेब्यूची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. आता कदाचित ती वेळ आलीय. मोठ्या पडद्यावर ‘लार्जन दॅन लाईफ’ इमेजसाठी ओळखला जाणारा महेशबाबू त्याच्याच एका तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. अलीकडे महेशबाबूचा ‘स्पायडर’ हा तेलगू सिनेमा प्रदर्शित झाला होता. खरे तर आंध्रातील प्रेक्षकांना हा चित्रपट फार भावला नव्हता. पण तामिळनाडूत या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. याच स्पाय थ्रीलर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून महेशबाबू बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकतो.
‘स्पायडर’ ही लोकांच्या मदतीसाठी सॉफ्टवेअर बनवणा-या एका व्यक्तिची कथा आहे. तो सॉफ्टवेअर बनवतो आणि मग कॉल डिटेल्सच्या मदतीने लोकांची मदत करायला पोहोचतो.   
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबासोबत स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासात महेशबाबू मुंबईला थांबला होता. यादरम्यान त्याने बॉलिवूड प्रोजेक्टच्या संदर्भात काही लोकांच्या भेटी घेतल्याचे कळते. अर्थात या भेटीसंदर्भात फार तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
आधी ऋतिक रोशन वा सलमान खान ‘स्पायडर’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसू शकतात,अशी बातमी आली होती. पण कदाचित आता महेशबाबू हाच या रिमेकमध्ये इंटरेस्टेड दिसतोय. असे झाले तर बॉलिवूडच्या चाहत्यांना ते हवेच आहे. आपल्या हिंदी डब सिनेमांमुळे महेशबाबू बॉलिवूड चाहत्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे.

ALSO READ : BOX OFFICE : महेश बाबूच्या ‘या’ चित्रपटाची दोन आठवड्यातील कमाई जाणून तुम्हाला धक्का बसेल!

महेशबाबूच्या अनेक तेलगू चित्रपटांचा हिंदी रिमेक बनला आहे. अशाच एका चित्रपटाने सलमान खानचे आयुष्य बदलले होते. होय, प्रभुदेवाने महेशबाबूचा ‘पोकरी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला होता. ‘वॉन्टेड’ नावाने आलेल्या या चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत दिसला होता. या  चित्रपटात सलमानचा नवा अ‍ॅक्शन अवतार दिसला होता.

Web Title: South superstar Maheshbaba will come to Bollywood! 'This' film will be debuted !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.