साऊथ इंडस्ट्रीच्या ‘या’ हॉट बाला करणार बॉलिवूडसोबत मुकाबला!

By अबोली कुलकर्णी | Published: November 13, 2018 04:37 PM2018-11-13T16:37:17+5:302018-11-13T16:41:41+5:30

प्रत्येक चित्रपटात या साऊथच्या तारका भाव खाऊन जातात. त्यांचा अभिनय कायम लक्षात राहण्याजोगा होतो. आता काही हॉट साऊथच्या तारका बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

 The South industry's 'Hot' bashing with Bollywood! | साऊथ इंडस्ट्रीच्या ‘या’ हॉट बाला करणार बॉलिवूडसोबत मुकाबला!

साऊथ इंडस्ट्रीच्या ‘या’ हॉट बाला करणार बॉलिवूडसोबत मुकाबला!

googlenewsNext

अबोली कुलकर्णी

साऊथ इंडस्ट्रीच्या अभिनेत्रींचे सौंदर्य भल्याभल्यांना भूरळ घालते. कायमच त्यांचा अभिनय आणि त्यांचे सौंदर्य हे बॉलिवूडच्या तारकांपेक्षा उजवे असल्याचे आपण पाहतो. प्रत्येक चित्रपटात या साऊथच्या तारका भाव खाऊन जातात. त्यांचा अभिनय कायम लक्षात राहण्याजोगा होतो. आता काही हॉट साऊथच्या तारका बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. चला तर मग पाहूयात कोण आहेत या हॉट दाक्षिणात्य बाला....

वेदिका
कन्नड चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करणारी  अभिनेत्री वेदिका ‘द बॉडी’ या चित्रपटांतून तिच्या बॉलिवूड प्रवासाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात ती इमरान हाश्मी याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट म्हणजे मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा बॉलिवूड डेब्यू आहे. इमरान सध्या त्याचा होम प्रोडक्शन चित्रपट ‘चीट इंडिया’ मध्ये बिझी आहे.

श्रद्धा श्रीनाथ
  ‘झिरो’ या चित्रपटात तिग्मांशु धुलिया हे शाहरूख खानच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपट ‘मिलन टॉकीज’ हा चर्चेत आहे. या चित्रपटात अली फजल हा मुख्य भूमिकेत आहे. यातच दाक्षिणात्य अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथ ही त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा तिचा बॉलिवूड डेब्यू म्हणायला हरकत नाही.

शर्मीला मांदे
दिग्दर्शक खालिद मोहम्मद हे ८० च्या दशकांतील चित्रपटाच्या त्याच नावासह रिमेक बनवत आहेत. या चित्रपटात मनीष पॉल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री शर्मीला मांद्रे ही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. शर्मीला त्याच भूमिकेत आहे, जी भूमिका दीप्ती नवल हिने साकारली होती.

रेजिना कैसेंड्रा
‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून रेजिना कैसेंड्रा ही बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर यांच्यासोबत तिला काम करायला मिळाले. राजकुमार राव देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रेजिना तमिळ, तेलुगू आणि कन्नड या सिनेमात काम करत आहे.

मेघा आकाश
 सूरज पांचोली हे सध्या ‘सॅटेलाईट शंकर’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. या चित्रपटाला इरफान कमाल दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून कॅटरिना कैफची बहीण इजाबेल कैफ बॉलिवूड डेब्यू करणार आहे. त्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाश देखील बॉलिवूडमधून  डेब्यू करत आहे.                                            

Web Title:  The South industry's 'Hot' bashing with Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.