Sounds of social media festooned by the beauties of the temple! | मंदिरा बेदीने बिकिनी फोटोशूट करून सोशल मीडियावर उडविली खळबळ!

‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी टीव्हीवरची ‘शांती’ म्हणजेच मंदिरा बेदी सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. मंदिराचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता तिने तिच्या चित्रपटांपेक्षा स्वत:च्या लूक आणि स्टाइलवर केलेल्या बदलांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे. अजूनही ती तिचे जलवे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवित असते. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करीत असते. आता तिने तिचे काही बिकिनी फोटो सोशल अकाउंटवर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. 
 

वास्तविक मंदिरा नेहमीच बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. परंतु यावेळचा तिचा जलवा काही औरच आहे. फुकेटमध्ये बीचवर सनबाथ घेताना दिसत असलेली मंदिरा खूपच हॉट दिसत आहे. त्याचबरोबर मंदिरा स्वत:च्या फिटनेसवर किती मेहनत घेते हेही यातून दिसून येते. खरं तर मंदिरा तिच्या फिटनेसबद्दल खूप सतर्क आहे. ती नेहमीच न विसरता जिममध्ये जाणे पसंत करते. 
 

मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते. मंदिरा बºयाचदा गौरव गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणे पसंत करते. फॅशनबद्दल मंदिराचे म्हणणे आहे की, प्रत्येक ड्रेस व्यवस्थित असायला हवा. जर तुम्ही साडी परिधान करीत असाल तर त्याच्यावर ज्वेलरी किंवा इअररिंग्स घालायलाच हव्यात, तर ड्रेसवर जेवढे सिम्पल राहता तेवढे तुमचे सौंदर्य खुलून दिसेल. 
Web Title: Sounds of social media festooned by the beauties of the temple!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.