Soumita Sen's breakup with 10th boyfriend! | ​१० व्या बॉयफ्रेंडशी सुष्मिता सेनचा ब्रेकअप !

चार वर्षांहून अधिक काळ सुष्मिता सेन आणि रितिक भसीन हे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र नुकताच त्यांना ब्रेकअप झाल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. दोघांनी कायमस्वरुपी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की, सुष्मिता सेनचा हा दहावा बॉयफ्रेंड होता आणि एवढ्या कमी वेळेत त्यांच्या नात्यात  बऱ्याचदा दूरावा निर्माण झाला होता. 

सूत्रांनी म्हटले आहे की, ‘सुष्मिता आणि रितिकचा ब्रेकअप झाला असून सुष्मिता आता सिंगल आहे, मात्र ज्याप्रकारे नेहमी प्रमाणे आपल्या मागिल ब्रेकअपनंतर दु:खी न होता नव्या नात्याचे स्वागत करते, यावरुन हे स्पष्ट होते की, प्रेमासाठी तिचे मनाचे दरवाजे नेहमी खुले असतात, मग काहीही होवो..!’ 

सुष्मिता सेनने अगोदरही बऱ्याचजणांशी डेट केली आहे, मात्र कुणाशी तिचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अकरम, मुदस्सर अजीज, इमतियाज खत्री, मानव मेनन, संजय नारंग, सबीर भाटिया, बंटी सचदेवा यांच्यासोबत तिचे अफेअर होते.   

रितिक भसीन बऱ्याच नाइटक्लब्सचा मालिक आहे. अर्जुन कपूर, अभिषेक कपूर, समीर दत्तानी, श्वेता साल्वेसह बी-टाउनचे बरेच सेलिब्रिटीज त्याचे मित्र आहेत. त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीदेखील आहे. चित्रपटांपेक्षा आपला अ‍ॅटिट्यूय आणि खुल्या विचारांची सुष्मिता सेनने कधीही आपल्या लव लाइफवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला नाही. ती एका मुलाखतीत म्हटली होती की, ‘मी लग्न करु इच्छिते, जेव्हा १६ वर्षाची होती तेव्हापासून माझ्या मनाची ही अपेक्षा आहे. मात्र काही गोष्टींप्रमाणे मी याबाबतदेखील घाई करणार नाही. मी नेहमी मानते की, माझे लग्न योग्य वेळीच होईल.’  
Web Title: Soumita Sen's breakup with 10th boyfriend!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.