सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:39 PM2019-02-07T12:39:03+5:302019-02-07T12:40:37+5:30

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.

sonu nigam was hospitalised due to allergy while returning from a concert | सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल

सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.
सोनूने स्वत: इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. सी फूड खाल्ल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. रूग्णालयात पोहोचायला आणखी उशीर झाला असता तर गंभीर स्थिती ओढवली असती. माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती आणि मी श्वास घेऊ शकलो नसतो, असे सोनूने म्हटले आहे. अ‍ॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.


एका फोटोत सोनू आयसीयूमध्ये भरती असलेला दिसतोय तर दुसºया फोटोत त्याचा डावा डोळा सुजलेला दिसतोय. तूर्तास सोनूची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अलीकडे सोनू एका व्हिडीओमुळे चर्चेत आला होता. होय, त्याचा हा व्हिडीओ  सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. यात सोनू एका चाहत्याचा हात मुरगळताना दिसला होता. एका कार्यक्रमातून कार्यक्रम संपवून सोनू बाहेर येताच, एक चाहता समोर आला आणि  सोनूच्या खांद्यावर हात टाकून सेल्फी घेऊ लागला. कदाचित सोनूला हे आवडले नाही. त्याने लगेच त्या चाहत्याचा हात आपल्या खांद्यावरून काढला आणि तो जोरात मुरगळला. अर्थात यानंतर सोनूने लगेच चाहत्याचा हात सोडला आणि हसत हसत त्याच्यासोबत सेल्फी काढला. प्रकरण तापण्याआधीच सोनूने हसतहसत आपली बाजू सांभाळली होती.

Web Title: sonu nigam was hospitalised due to allergy while returning from a concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.