sonu ke titu ki sweety actress nushrat bharucha singed salman khan productions upcoming wedding drama film | ‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री!
‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री!

ठळक मुद्दे‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अलीकडे आयुष शर्मा, वरिना हुसैन, जहीर इक्बाल, प्रनूतन बहल यांना संधी दिली. आता सलमानच्या कंपूत आणखी एका नावाची एन्ट्री झाली आहे. हे नाव आहे, अभिनेत्री नुसरत भारूचा  हिचे.
होय, नुसरत बॉलिवूडमध्ये नवी नाही. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरतला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे.

अद्याप चित्रपटाचे संपूर्ण कास्टिंग बाकी आहे. पण नुसरतचे नाव फायनल झाले आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल. नुसरत व आयुष्यमान खुराणाचा आगामी चित्रपट ‘ड्रिमगर्ल’ दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राज सांडिल्य हे या भाईजान निर्मित चित्रपटाचे संवाद लिहित आहे. या चित्रपटात एका लहानशा गावातील प्रेमकथा दाखवली जाईल.


‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चयार्चा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. साहजिकचं नुसरत भारूचा आणि कार्तिक आर्यन या चित्रपटातील दोन्ही लीड कलाकारांना याचा सर्वाधिक फायदा मिळाला. 


Web Title: sonu ke titu ki sweety actress nushrat bharucha singed salman khan productions upcoming wedding drama film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.