नवरात्रौत्सव बॉलिवूड सेलिब्रेटींसाठीसुद्धा खास असतो. सर्वसामान्यप्रमाणे सेलिब्रेटी ही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. नवरात्रौत्सवात बॉलिवूडच्या गायक खूपच डिंमाडमध्ये असतात. कारण त्यांच्या गाण्यांशिवाय हा उत्सव पूर्णच होत नाही. त्यामुळे नवरात्रौत्सवात हे सिंगर आपली वर्षभराची कमाई करुन घेतात असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक नजर टाकूया कोणते गायक-गायिका किती मानधन आकरतात ते. 

नेहा कक्कड : तनु वेड्स मनु रिटर्न मध्ये लंडन ठुमकदा या गाण्यामुळे नेहा कक्कड एकाच रात्रीत प्रकाश झोतात आली. नेहा इंडियन आयडॉलच्या सीजन 2 ची स्पर्धक होती. सध्या ती एक रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते आहे.  इतर गायकांप्रमाणे नेहाचा आवाज ही डिमांडमध्ये असतो. ती जवळपास 15 लाखांचे मानधन नवरात्रौत्सवादरम्यान आकारते. मिका सिंग :  पॉप सिंगर आणि रॅपर म्हणून मिका सिंगने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिकाच्या आवाजाची जादू फक्त चित्रपट नाही तर गरब्यात सुद्धा चालते. गरब्यामध्ये एक दिवस गाण्यासाठी मिका जवळपास 30 ते 35 लाख रुपये घेतो. 
  


कुमार सानू : यांनी 90चे दशक आपल्या आवाजाने गाजवले आहे. तब्बल 5 वेळा त्यांना पार्श्वगायनासाठी फिल्म फेअर अॅवॉर्ड सन्मानित करण्यात आले आहे. आजही भलेही ते बॉलिवूडमध्ये जास्त गाणी गात नसतील मात्र गरब्यामध्ये दरम्यान त्याच्या गाण्यांना प्रचंड मागणी असते. कुमार सानू नवरात्रौत्सवात एक दिवस आपल्या आवाजाची जादू बिखरण्यासाठी 15 ते 20 लाखांचे मानधन घेतात. 


प्राजक्ता शुक्रे :  हि इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीजनमध्ये झळकली होती. प्राजक्ताचे करिअर बॉलिवूडमध्ये फारसे काही चालेल नाही मात्र इंदौरमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान त्याच्या आवाजला प्रचंड मागणी असते. प्राजक्ता नवरात्रौत्सवात  एक दिवस गाण्यासाठी 3 ते 4 लाखांचे रुपये आकारते.    


हिमेश रेशमिया : आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातून केली. पदार्पणातच हिमेशने चित्रपटाला दिलेले संगीत हिट ठरले. हिमेश एक चांगला संगीतकार तर आहेच याचबरोबर तो चांगला गायकदेखील आहे. नवरात्रौत्सवात हिमेशदेखील सहभागी होती. गरब्यामध्ये एक रात्र गाण्यासाठी तो 30 ते 35 लाखांचे मानधन घेतो.  

Web Title: 'This' song takes place between Navratrotsva ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.