Song Out:  ‘सिम्बा’चे दुसरे गाणे ‘तेरे बिन’ रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:41 PM2018-12-14T13:41:17+5:302018-12-14T13:42:40+5:30

सारा अली खान व रणवीर सिंग यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा व रणवीरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सिम्बा’चे दुसरे गाणे रिलीज झालेय.

Song Out: simmbas romantic song tere bin is out watch romantic chemistry of ranveer singh and sara ali khan | Song Out:  ‘सिम्बा’चे दुसरे गाणे ‘तेरे बिन’ रिलीज!

Song Out:  ‘सिम्बा’चे दुसरे गाणे ‘तेरे बिन’ रिलीज!

googlenewsNext
ठळक मुद्दे हे रोमॅन्टिक गाणे पाहून तुम्ही साराचा नुकताच रिलीज झालेला ‘केदारनाथ’ विसरून जाल. गाण्यात साराचा सिंपल आणि देसी लूक कुणालाही भुरळ पाडेल असा आहे.  

सारा अली खानरणवीर सिंग यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा व रणवीरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सिम्बा’चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ‘तेरे बिन’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत. हे रोमॅन्टिक गाणे पाहून तुम्ही साराचा नुकताच रिलीज झालेला ‘केदारनाथ’ विसरून जाल. गाण्यात साराचा सिंपल आणि देसी लूक कुणालाही भुरळ पाडेल असा आहे.  


राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष्क बागची यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल लिहिले आहेत रश्मी विरागने आणि ते संगीतबद्ध केले आहे, तनिष्क बागचीने. धर्मा प्रॉडक्शन व रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा सिनेमा येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
यापूर्वी रिलीज झालेले या चित्रपटाचे ‘आंख मारे’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आहे.  हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’ चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे. ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’ हे ओरिजनल गाणे कुमार सानू यांनी गायले होते.  ‘सिम्बा’हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. 

Web Title: Song Out: simmbas romantic song tere bin is out watch romantic chemistry of ranveer singh and sara ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.