song out: Look, life's Khurana and Land Pudanekar's 'Cute Love Story' | song out : पाहा, आयुष्यमान खुराणा व भूमी पेडणेकरची ‘क्यूट लव्हस्टोरी’

‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आता या चित्रपटाचे नवे गाणे ‘कान्हा’ रिलीज झालेय. आयुष्यमान खुराणा व भूमी पेडणेकर यांच्यावर चित्रीत या गाण्यात दोघांमधील क्यूट लव्हस्टोरी आणि तेवढेच क्यूट रोमॅन्टिक क्षण दाखवले आहेत. या गाण्यातील आयुष्यमान व भूमीची केमिस्ट्री तुम्हाला जाम आवडणार. इतकी की, गाणे संपल्याशिवाय तुम्ही त्यावरून नजर हटवू शकणार नाही. गाण्यात एक दृश्य आहे. भूमी आयुष्यमानसाठी जेवण आणते. पण आयुष्यमानला ते आवडत नाही. मग काय, यामुळे भूमी रूसून बसते. कुठल्याही लव्हस्टोरीत असतात असेच  अनेक गोड प्रसंग या गाण्यात दाखवले आहेत. तनिष्क-वायूचे बोल असलेले हे गाणे शाशा तिरूपतीने गायले आहे. हे गाणे तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला कळवायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील  ‘नॉन कुल’ मुदित आणि ‘नॉन हॉट’ सुगंधा यांचे प्रेम आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास  दाखवण्यात आला आहे.   चित्रपटात भूमी सुगंधा नामक मुलीची भूमिका साकारतेय तर आयुष्यमान मुदित नामक पात्र रंगवतोय. हा चित्रपट तामिळ चित्रपट ‘कल्याना समयल साधम’चा हिंदी रिमेक आहे. आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १ सप्टेंबरला आपल्या भेटीस येतो आहे. तत्पूर्वी येत्या शुक्रवारी भूमीचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. यात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. सध्या भूमी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर आयुष्यमानने ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाचे प्रमोशन चालवले आहे.
Web Title: song out: Look, life's Khurana and Land Pudanekar's 'Cute Love Story'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.