Sonchiriya teaser: Sushant Singh Rajput and Bhumi Pednekar's film Sonchiriya | बैरी, बेईमान, बागी सावधान...! पाहा, ‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर!!
बैरी, बेईमान, बागी सावधान...! पाहा, ‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर!!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला.  ‘सोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे. 
इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.


  सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  या सगळ्यांची झलक  टीजरमध्ये दिसतेय. पण  सुशांत व भूमीला या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे. दोघेही पहिल्यांदा अशा आगळ्या-वेगळ्या रूपात दिसत आहेत. अलीकडे एका मुलाखतीत, या चित्रपटातील भूमिका मी केवळ एक आव्हान म्हणून स्वीकारल्याचे सुशांतने सांगितले होते. हे आव्हान पेलण्यात सुशांत किती यशस्वी झाला हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरचं कळेल. तूर्तास चित्रपटाचा टीजर पाहून सुशांत या भूमिकेत अगदी फिट बसल्याचे दिसतेय. तुम्हीही टीजर पाहा आणि तुम्हाला काय वाटते, ते जरूर कळवा.
 ‘सोन चिरैया’मध्ये १९७० च्या दशकातील कथा  पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे. 

English summary :
Actor Sushant Singh Rajput starer upcoming film 'Son Chirayya's teaser released New poster of this movie was released a few hours ago, and soon after that the teaser was released. 'Son Chirayya' is based on the life of the robbers of chambal. Sushant Singh Rajput, along with Bharti Pednekar, Manoj Bajpayee, Ashutosh Rana, Ranvir Shorey also have important roles.


Web Title: Sonchiriya teaser: Sushant Singh Rajput and Bhumi Pednekar's film Sonchiriya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.