Sonam's marriage came to an end, the question posed by everyone, what will happen to the music ceramani? | ​सोनमच्या लग्नात आले हे विघ्न, सगळ्यांना पडला प्रश्न आता काय होणार संगीत सेरेमनीचे

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा ८ मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या गोष्टीला दोघांच्या कुटुंबीयांदेखील दुजोरा दिला आहे. कपूर आणि अहुजा कुटुंबीयांकडून लग्नाची तारीख कन्फर्म करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की, सोनम आणि आनंद यांचे ८ मे ला लग्न होणार असून ही दोन्ही कुटुंबियांची खाजगी बाब आहे. त्यामुळे मीडियाने आम्हाला प्रायव्हसी द्यावी. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वाद आणि प्रेमासाठी धन्यवाद. सोनम कपूर आणि आनंद अहुजा याआधी लंडनमध्ये लग्न करणार होते. मात्र सोनमच्या आजीमुळे हे लग्न मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार सोनमच्या आजीची तब्येत ठिक नाहीये. डॉक्टरांनी त्यांना परदेशी प्रवास टाळायला सांगितला आहे.   
सोनम आणि आनंदची हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम ७ मे रोजी मुंबईतील एका फाईव्ह स्टाइल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. संगीत सेरेमनीची तयारी तर गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. सोनमच्या लग्नात तिची चुलत भावंडं म्हणजेच अर्जुन कपूर, जान्हवी कपूर परफॉर्मन्स सादर करणार आहेत. सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी फराह खान कोरिओग्राफी करत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून फराहच्या देखरेखीखाली तालमी सुरू आहेत. पण फराहचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याने सोनमच्या संगीत सेरेनमीचे आता काय होणार असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. 
फराह एका कार्यक्रमाचे चित्रीकरण करत असताना तिचा पाय घसरला असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. फराहनेच सोशल मीडियावर तिचा फोटो पोस्ट करून सगळ्यांना याविषयी सांगितले आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोमवारी ती घसरून पडली. फराह पडल्यामुळे आता सोनमच्या संगीत सेरेमनीची रिहर्सल बंद झाली आहे. 
सोनमचे लग्न अनिल कपूरची जवळची नातेवाईक इंटेरिअर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात होणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार, कविता सिंगचा हा बंगला ५५ हजार स्केअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे. या बंगल्याचे नाव रॉकडेल असून तो खूपच आलिशान आहे. 

Also Read : बहिण सोनम कपूरला लग्नात 'हे' खास गिफ्ट देणार हर्षवर्धन कपूर
Web Title: Sonam's marriage came to an end, the question posed by everyone, what will happen to the music ceramani?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.