हिरो नाही तर ‘या’ हिरोईनसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार सोनम कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:29 AM2019-01-31T10:29:08+5:302019-01-31T10:30:56+5:30

काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय.

sonam romance in film ek ladki ko dekha to aisa laga with regina cassandra | हिरो नाही तर ‘या’ हिरोईनसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार सोनम कपूर!

हिरो नाही तर ‘या’ हिरोईनसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार सोनम कपूर!

googlenewsNext
ठळक मुद्देरेजीना कंसाड्रा साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’द्वारे ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट उद्या १ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. सोनम कपूर आणि अनिल कपूर ही रिअल लाईफ बाप-लेकीची जोडी या चित्रपटात प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. होय, काल या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले.

या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये आहे. पण पहिल्यांदा ती पडद्यावर हिरोसोबत नाही तर हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. होय, म्हणायला या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आहे. पण सोनमचा चित्रपटातील लव्ह इंटरेस्ट राजकुमार नाही तर एक मुलगी आहे. ट्रेलरमध्ये या मुलीची एक झलक दिसली होती. पण ही हिरोईन कोण, हे गुलदस्त्यात होते. तर आता तिच्या नावाचा खुलासाही झाला आहे. या हिरोईनचे नाव आहे रेजीना कंसाड्रा. 


रेजीना कंसाड्रा साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’द्वारे ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. यापूर्वी अनेक तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटात तिने भूमिका वठवल्या आहेत.


 ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’मध्ये ती कुकू नामक तरूणीचे पात्र साकारताना दिसणार आहे. ही कूकू स्वीटी अर्थात सोनम कपूरवर प्रेम करते. तूर्तास  ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाची कथा चर्चेचा विषय ठरते आहे. सोनम, अनिल व राजकुमार राव यांच्याशिवाय जुही चावला यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

Web Title: sonam romance in film ek ladki ko dekha to aisa laga with regina cassandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.