Sonam Kapoor's wedding date is confirmed, this Bollywood celebrity gets a wedding invitation! | सोनम कपूरच्या लग्नाची डेट झाली कन्फर्म, या बॉलिवूड सेलिब्रेटीना मिळाले लग्नाचे आमंत्रण !

सोनम कपूर आणि आनंद आहुजा पुढच्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अजूनपर्यंत त्यांच्या लग्नाची तारीख कंर्फन्म होऊ शकली नव्हती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 आणि 7 तारखेला मुंबईत सोनम कपूरचे लग्न होणार आहे.  

मुंबईत लग्न केल्यानंतर ती दिल्लीत एक ग्रँड रिसेप्शन देणार आहे. कारण आनंद दिल्लीचा राहणार आहे. याआधी दोघांच्या कुटुंबीयांनी जयपूरच्या उदयपुरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लॉन होता त्यानंतर अशी ही चर्चा होती लग्नासाठी दोघांनी स्वित्झर्लंडची निवड केली आहे. मात्र दोघे मुंबईतच लग्न करतायेत.   
सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 150 लोक हे लग्न अटेंड करू शकतात. ऐवढ्या लोकांना स्वित्झर्लंडमध्ये घेऊन जाणं कठिण झाले असते. दोघांच्या कुटुंबीयांमधील वृद्ध व्यक्तिना तिकडे घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मुंबईत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. कपूर कुटुंब जोरात लग्नाच्या तयारीला लागले आहेत. लग्न वांद्रे किंवा जुहूच्या हॉटेलमध्ये होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि करीना कपूरला लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. 

सोनम गेल्या 4 वर्षांपासून बिझनेसमन आनंद आहुजाला डेट करते आहे. दोघांना अनेक वेळा परदेशात पार्टीत करताना आणि एकत्र फिरताना पाहण्यात आले आहे.  सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे.

जूनमध्ये सोनमचा  'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे
Web Title: Sonam Kapoor's wedding date is confirmed, this Bollywood celebrity gets a wedding invitation!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.