Sonam Kapoor's latest news of the superstar gave this! | सोनम कपूरच्या लग्नाच्या बातमीला ‘या’ सुपरस्टारने दिला दुजोरा!

अभिनेत्री सोनम कपूर हिच्याकडे सध्या आनंदाच्या दोन बातम्या आहेत. एक तर ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे, तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तिचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात ती अभिनेता अक्षयकुमारसोबत बघावयास मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की, सोनम कपूर एप्रिल २०१८ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. परंतु याविषयी कोणीही खात्रीशीरपणे सांगितले नसल्याने यात कितपत तथ्यता आहे हे सांगणे जरा मुश्कीलच म्हणावे लागेल. परंतु बॉलिवूडच्या या सुपरस्टारने सोनमच्या लग्नाच्या बातमीचे काहीसे संकेत दिले आहेत. 

होय, अभिनेता अक्षयकुमार याने ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनदरम्यान, सोनम लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे. त्याचे झाले असे की, ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनसाठी अक्षयकुमार आणि सोनम कपूर इनोव्हेशन कॉन्क्लेवमध्ये पोहोचले होते. याठिकाणी सोनम कपूर खूपच एक्सायटेड झाल्याचे दिसून आले. उत्साहाच्या भरात तिने येथील एका आॅटोमॅटिक कुकिंग मशीनला बघून काही प्रश्नही विचारले. सोनमने म्हटले की, मला स्वयंपाक करता येत नाही. तसेच माझ्या आईलाही स्वयंपाक करता येत नाही. सोनमने अक्षयकुमार याच्याकडे इशारा करताना म्हटले की, मला जरी स्वयंपाक करता येत नसला तरी, अक्षय सर यांना चांगला स्वयंपाक करता येतो. सोनमच्या या वाक्यानंतर अक्षयने म्हटले की, सोनम मला तुला विचारायचे आहे की, तू यावर्षी लग्न करणार आहेस काय? जर तू यावर्षी लग्न करणार असशील तर मी तुला आॅटोमॅटिक कुकिंग मशीन गिफ्ट करणार. ज्याच्या माध्यमातून तू किंवा तुझा पती स्वयंपाक करू शकेल. अक्षयच्या या प्रश्नामुळे सोनम निरुत्तर झाली. तिने केवळ हसून अक्षयला दाद दिली. सोनमचा चेहरा बघून प्रत्येकालाच वाटत होते की, ती याचवर्षी विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. 

Web Title: Sonam Kapoor's latest news of the superstar gave this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.