'This' is Sonam Kapoor's Godmother, you will be stunned by the reaction of the reception! | 'ही' आहे सोनम कपूरची ‘गॉडमदर’, रिसेप्शनमधील तिचा अंदाज बघून तुम्हीही दंग व्हाल!

बºयाचदा लग्न समारंभात काही मजेशीर किस्से घडत असतात. असाच काहीसा किस्सा अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नात बघावयास मिळाला. सोनमच्या लग्नात बॉलिवूड सेलेब्सबरोबरच कपूर आणि आहुजा परिवारातील बरेचसे नातेवाईक सहभागी झाले होते. यादरम्यानच एक मजेशीर किस्सा घडला. त्याचे झाले असे की, ८ मेच्या रात्री हॉटेल लीला येथे लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आमंत्रित मंडळी सहभागी होत होती. यावेळेस एक अशी महिला समोर आली जी सोनम कपूरची ‘गॉडमदर’ असल्याचे सांगत होती. तिचा अंदाज बघण्यासारखा होता. सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 
 

वास्तविक सोनम बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आजमी यांना ‘गॉडमदर’ मानते. ज्यांनी ‘नीरजा’ या चित्रपटात सोनमच्या आईची भूमिकाही साकारली होती. शबाना सोनमच्या लग्नात सहभागी होऊ शकल्या नाहीत. परंतु एक अन्य महिला सहभागी झाली होती, जी स्वत:ला सोनमची गॉडमदर सांगत होती. ही महिला सोनमची नातेवाईक आहे की मैत्रीण याविषयीची कुठलीही माहिती मिळू शकली नाही. मात्र रिसेप्शन पार्टीत जात असताना हातात वाइनचा ग्लास घेऊन या महिलेनी फोटोग्राफर्सला अशा काही पोज दिल्या की, त्यांनाही धक्का बसला. त्यांनी या महिलेला आवर्जून तिची ओळख विचारली. त्यावर तिने ‘नवरीची गॉडमदर’ असल्याचे सांगितले. 
 

याव्यतिरिक्त सोनमच्या लग्नातील एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शाहरूख आणि त्याच्या पत्नीशी संबंधित आहे. जेव्हा हे दोघे रिसेप्शन पार्टीत सहभागी होताना माध्यमांसमोर फोटो काढण्यासाठी उभे राहतात. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. हा व्यक्ती सुरुवातीला शाहरूखशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शाहरूख आणि गौरीच्या पाठीमागे उभे राहून माध्यमांना पोज देतो. बाजूलाच उभे असलेले काही सुरक्षारक्षक त्याला तेथून बाजूला करण्याचा प्रयत्न करतात.
Web Title: 'This' is Sonam Kapoor's Godmother, you will be stunned by the reaction of the reception!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.