सध्या बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. सोनम आनंद आहुला डेट गेली 4 वर्ष डेट करते आहे. या चर्चा ताज्या असतनाचा सोनमच्या भावाच्या अफेअरची देखील चर्चा होऊ लागली आहे. 
 

हर्षवर्धन मोनिका डोंगराला डेट करतो आहे. नुकतेच दोघांना एकत्र डिनर डेटवर गेलेल पाहण्यात आले. मोनिका तर मीडियाच्या कॅमेऱ्यांना बघून हसताना दिसली मात्र हर्ष कॅमेऱ्यांच्या नजरा टाळताना दिसला. दोघांना खारमधल्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर पडताना पाहण्यात आले. मीडियाचे कॅमेरे बघून हर्ष काहीसा नाराज दिसला. मात्र तो पर्यंत हर्षचे फोटो काढण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार दोघे गेल्या काही महिन्यांपासून गुप-चूप एकमेकांना डेट करतायेत. सतत ते एकमेकांच्या संपर्कत असल्याचे ही समजते आहे. या दोघांनामध्ये नेमक काय शिजते आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. 


मोनिकाच्या आधी हर्षच्या सैफ अली खानची मुलगी सारा अली खानला डेट करत होता. दोघांना अनेक वेळा एकत्र फिरताना पाहण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याचे कळले. साराशी ब्रेकअप झाल्यानंतर हर्षच्या आयुष्यात मोनिकाची एंट्री झाली आहे.     


हर्षवर्धन पडद्यावर अभिनव बिंद्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात त्याच्यासोबत त्याचा डॅडी अनिल कपूरसुद्धा दिसणार आहे.  अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर बाप-मुलाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत.  खरं तर या दोघांना पडद्यावर बघणे प्रेक्षकांसाठीही एक चांगला अनुभव ठरू शकणार आहे. 

मिर्झिया' चित्रपटातून हर्षवर्धन आणि सयामी खेर यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'मिर्झिया' याचित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. मात्र हर्षवर्धनला त्याच्या बेस्ट डेब्यूचे अॅवॉर्ड मिळाले. हर्षवर्धनच्या पोस्टला त्याचे फॅन्स लाईक करतायेत. अभिनवचे चित्रपटची वाट सगळे आतुरतेने करतायेत. मिर्झियानंतर हर्षवर्धन ‘भावेश जोशी’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होती. अनिल कपूरचा मुलगा असल्याने हर्षवर्धनकडून प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षा होत्या. मात्र पदार्पणात तो त्या पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन एका हिटच्या शोधात आहे. त्यामुळे हर्षवर्धनच्या आयुष्यावर आधारित तयार होत असलेल्या चित्रपटातून त्याला तो मिळेल अशी आशा करुया.  
Web Title: Sonam Kapoor's brother, who fell in love with the actress after the breakup of Sarah Ali Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.