Sonam Kapoor shared 'this' photo on Facebook, getting married in the month of marriage. | सोनम कपूरने फेसबूकवर शेअर केला 'हा' फोटो, या महिन्यात अडकणार लग्नाच्या बेडीत..

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्न करणार आहे . सोनमने आपल्या फेसबुक अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचा वेडिंग लूकमधला फोटो शेअर केला आहे, बातमी अशी पण आहे की या वर्षातच ती सुद्धा लग्न करणार आहे.  ह्याआधी सुद्धा सोनम कपूर आनंद बरोबर सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली होती. आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी अलीकडे सोनम कोलकात्यात आनंदच्या आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली होती. यावरून सोनम व आनंदच्या लग्नाच्या बातम्यांना जोर चढला आहे. जयपूरमध्ये या लग्नाचा व्हेन्यू बुक झालायं, इथपर्यंतही चर्चा आहे.मिळालेले माहितीनुसार दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. लग्न संपूर्ण पंजाबी पद्धतीने होणार आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नासाठी जवळपास 300 पाहुण्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या कधी स्वीकरले नाही आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे.  त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे.    

ALSO READ :  सोनम कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा पर्सनल व्हिडीओ झाला लीक, पाहा व्हिडीओ!

लवकरच सोनम कपूर अक्षय कुमारच्या पॅडमॅनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आर. बल्की दिग्दर्शित हा चित्रपट अरूणाचलम मुरूगनाथनमचच्या आयुष्यावर बेतलेली कथा आहे. या चित्रपटात सोनम कपूरसोबत राधिका आपटे ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यानंतर ती  वीरे दी वेडींगमध्ये झळकणार आहे.  वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.
Web Title: Sonam Kapoor shared 'this' photo on Facebook, getting married in the month of marriage.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.