Sonam Kapoor secretly buzzed with Urkala Proof of this! | सोनम कपूरने गुपचूप उरकला साखरपुडा; हा घ्या पुरावा!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या साखरपुड्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहेत. नुकत्याच एका पत्रकार परिषदेदरम्यान सोनम कपूरच्या हातात अंगठी बघावयास मिळाली. ज्यावरून हा अंदाज वर्तविला जात आहे की, तिने साखरपुडा उरकला असावा. जेव्हा सोनमला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिनेही यास स्पष्ट शब्दात नकार न देता असे काही उत्तर दिले ज्यावरून तिने साखरपुडा उरकल्याच्या चर्चेला एकप्रकारे बळच मिळाले. सोनम बिझनेसमॅन बॉयफ्रेंड आनंद आहुजा याच्यासोबत गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता हे दोघे लग्न करण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान, साखरपुडा केल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सोनम कपूरने म्हटले की, ‘मी माध्यमांसमोर माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलणे पसंत करीत नाही. जेव्हा एका पत्रकाराने तिच्या बोटातील अंगठीकडे इशारा केला, तेव्हा सोनमने म्हटले की, ‘ही वेडिंग रिंग नाही. जर असती तरी मी याविषयी माध्यमांसमोर बोलली नसती.’
 

नुकतेच अभिनेता मोहित मारवाही याच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीमध्ये अर्जुन कपूर आणि रिया कपूर यांनी सोनमच्या लग्नाबद्दल इशारा केला होता. या दोघांनी नाव न घेता सोनम कपूरच्या लग्नाचा उल्लेख करताना तिची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर अशीही बातमी समोर आली होती की, सोनम भाऊ मोहित मारवाह याच्या लग्नाबरोबर साखरपुडा उरकणार आहे. मात्र तिचे काका संजय कपूरने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार जून किंवा जुलैमध्ये हे दोघे उदयपूर येथे विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. सोनम आणि आनंद आहुजा अतिशय ग्रॅण्ड पद्धतीने लग्न करणार आहेत. 
Web Title: Sonam Kapoor secretly buzzed with Urkala Proof of this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.