Sonam Kapoor released 'Ha' in front of camera after Padman was released | पॅडमॅन रिलीज झाल्यानंतर सोनम कपूरने कॅमेऱ्यासमोर केला 'हा' खुलासा

अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर स्टारर पॅडमॅन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा गल्ला जमावला आहे. या तीन कलाकारांच्या या चित्रपटातील  अभिनयाचे देखील कौतूक करण्यात आले. मात्र पॅडमॅन चित्रपटातील सोनम कपूरच्या काही सीन्सवर कैची लावण्यात आली आहे. याचा खुलासा सोनम कपूरने केला आहे. चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी तिची भूमिका कमी करण्यात आली. 

Huffington Post इंडियाला दिलेल्या इंटव्हु दरम्यान सोनम म्हणाली, माझ्या भूमिकेवर चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी कैची फिरवण्यात आली. पॅडमॅनमध्ये माझे आणि अक्षयचे जे रिलेशनशीप दाखवण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक ते शूट केले गेले होते. मात्र त्या सीन्सना एडिट करण्यात आले. 

पॅडमॅन चित्रपटात  अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात आली.  या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. पॅड बनवण्याचा  प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचत नाही. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसतेय. 

तसेच 'वीरे दी वेडींग' हा सोनमचा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.

ALSO READ :  सोनम कपूरने गुपचूप उरकला साखरपुडा; हा घ्या पुरावा!

लवकरच सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत यावर्षी जूनमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मिळालेले माहितीनुसार दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. लग्न संपूर्ण पंजाबी पद्धतीने होणार आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नासाठी जवळपास 300 पाहुण्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. 

Web Title: Sonam Kapoor released 'Ha' in front of camera after Padman was released
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.