Sonam Kapoor, I do not care if the role is small | सोनम कपूर, भूमिका लहान असली तर मला फर्क नाही पडत

बॉलिवूडमध्ये सोनम कपूर लवकरच अक्षय कुमारसोबत पॅडमॅनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सोनम कपूरचे म्हणणे आहे की, चित्रपटातील भूमिका सशक्त असेल तर ती रोल मोठा आहे की छोटा यो गोष्टाचा फारसा फरक पडत नाही. नीरजा चित्रपटातील अभिनयासाठी सोनमला केवळ सकारात्मक प्रतिक्रिया नाही तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

सोनमने आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, भूमिका प्रभावशाली बनवण्यासाठी तुम्ही प्रत्येक फ्रेममध्ये असणे गरजेचे नाही. जर माझी भूमिका सशक्त आहे तर मी चित्रपटात फक्त तीन दृष्यांपुरती देखील मर्यादित असेल तर ती तिचा प्रभाव पाडते. मला माझी भूमिका लहान असली तरी फरक नाही पडत. 
 
या चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि  सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेत आहेत.चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. 
यानंतर सोनम वीरे दी वेडींगमध्ये दिसणार आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. 

ALSO READ :  ​​अक्षय कुमारच्या वागण्याने वैतागली ‘पॅडमॅन’ची टीम! पाहा व्हिडिओ!!

 
Web Title: Sonam Kapoor, I do not care if the role is small
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.