Sonam Kapoor discloses ban; 'I'm more concerned about personal life' | सोनम कपूरने केला खुलासा; ‘वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जास्तच कॉन्शियस’

बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर ही तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिला एखादी गोष्ट खटकली ती लगेचच त्याबद्दल बोलून टाकते, असे अनेक इव्हेंटमध्ये दिसून आले आहे. ‘फॅशनिस्टा’ म्हणून तिची असणारी ओळखही तिला फारशी आवडत नाही. म्हणून तिने अनेकदा मीडियालाही धारेवर धरले होते. अशातच सोनम कपूरने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. याबाबत खुलासा करताना ती म्हणते,‘ माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जास्तच कॉन्शियस आहे. माझ्या आयुष्यात सहजासहजी कुणीही डोकावू शकत नाही. मला असं वाटतं की, कुणी माझ्या आयुष्यात दखल देण्याचा प्रयत्न चालवला तर मला त्याचा त्रास होतो. मी ते सहन करू शकत नाही. त्यामुळे माझे कामावरून दुर्लक्ष होते.’ 

अभिनेत्री सोनम कपूर ही ८ मे रोजी आनंद अहुजा या दिल्ली येथील बिझनेसमॅनसोबत विवाहबद्ध होणार आहे. हा दिवस या दोघांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असणार आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबीय देखील या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाची जय्यत तयारी झाली असून संपूर्ण क पूर कुटुंबीय हे या विवाहसोहळयासाठी सज्ज झाले आहे. लग्नाानंतर सोनम 'वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनला लागणार आहे. १ जूनला 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. 

सोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. जुलैपासून सोनमला शैली चोप्रा दिग्दर्शित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'ची शूटिंगला सुरुवात करायची आहे. या चित्रपटातून शैली चोप्रा दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. यात सोनमसह अनिल कपूर, जुही चावला आणि राजकुमार रावसुद्धा असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोनम कपूर वडिल अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. 

Web Title: Sonam Kapoor discloses ban; 'I'm more concerned about personal life'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.