Sonam Kapoor and Anil Kapoor are shooting for the next film | सोनम कपूर आणि अनिल कपूर यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू

पहिल्यांदाच अनिल कपूर मुलगी सोनम कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आगामी चित्रपट एक लडकी को देखा तो ऐसा लगामध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. विधु विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरु होणार आहे. 

अनिल कपूर आणि मधु मालती या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सोनम कपूर लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. अनिल कपूर ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. गेल्या अनेक चित्रपटात त्यांने अशा प्रकारची भूमिका साकारलेली नाही. पाटियालाच्या फॅमिली हाऊसमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. दिग्दर्शिकेला शूटिंग ओरीजनल लोकेशनवर शूट करायचे आहे.    

अनिल आणि सोनम कपूरसोबत यात जुही चावलाची ही मुख्य भूमिका आहे. अनिल आणि जुईच्या जोडीने याआधी दीवाना मस्ताना आणि अंदाजसारख्या चित्रपटात अभिनय केला आहे. जुही फेब्रुवारीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शूट सुरू करणार आहे. 

लवकरच सोनम कपूर अक्षय कुमारच्या पॅडमॅनमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती  वीरे दी वेडींगमध्ये झळकणार आहे.  वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. तर अनिल कपूर ‘फन्ने खां’मध्ये दिसणार आहे. फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, यात अनिल कपूरसह  ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. 

ALSO RAED :  ​अक्षय कुमारच्या वागण्याने वैतागली ‘पॅडमॅन’ची टीम! पाहा व्हिडिओ!!


 
Web Title: Sonam Kapoor and Anil Kapoor are shooting for the next film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.