...म्हणून सोनम कपूरने आनंद अहुजाशी केले लग्न! लग्नाच्या दोन महिन्यानंतर झाला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 08:25 PM2018-07-17T20:25:15+5:302018-07-17T20:27:17+5:30

काही महिन्यांपूर्वी सोनम कपूरने बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लग्न केले. अगदी थाटामाटात पार पडलेल्या या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडिओ आपण पाहिलेच. पण हे लग्न होण्यामागचे खरे कारण, तुम्हाला ठाऊक आहे?

sonam kapoor and anand ahuja marriage sonam told the reason behind that | ...म्हणून सोनम कपूरने आनंद अहुजाशी केले लग्न! लग्नाच्या दोन महिन्यानंतर झाला खुलासा!!

...म्हणून सोनम कपूरने आनंद अहुजाशी केले लग्न! लग्नाच्या दोन महिन्यानंतर झाला खुलासा!!

googlenewsNext

अभिनेत्री सोनम कपूरलाबॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये ज्या काही फॅशन फ्रीक आहेत, त्यात सोनमचा क्रमांक सगळ्यांत वरचा आहे. काही महिन्यांपूर्वी सोनम कपूरने बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लग्न केले. अगदी थाटामाटात पार पडलेल्या या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडिओ आपण पाहिलेच. पण हे लग्न होण्यामागचे खरे कारण, तुम्हाला ठाऊक आहे? कदाचित नाही, कारण आत्ताकुठे सोनमने त्याबद्दल खुलासा केला आहे. सोनम आनंदवर प्रेम करते, म्हणून तिने त्याच्याशी लग्न केले, हेच आपण मानून चाललो होतो. अर्थात हे खरेही आहे. पण सोनमने आनंदसोबत लग्न करण्यामागे याशिवाय आणखी एक कारण आहे. हे कारण म्हणजे, फॅशनवरचे प्रेम.
  एकदा ‘वोग इंडिया’ या मॅगझिनला  दिलेल्या मुलाखतीत सोनमने आपले फॅशनप्रेम जाहीर केले होते. मी फॅशनवर जितके प्रेम करते, तितके प्रेम कुणीच करू शकत नाही, असे ती म्हणाली होती. याच फॅशनवरील प्रेमापोटी तिने आनंद अहुजाशी लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. होय, आनंदला टॅग करत, ‘आनंद फॅशन व रिटेलशी जुळलेला आहे, म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केले’, असे तिने म्हटले आहे. यासोबत सोनमने वोग इंडियाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय.




आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड Bhane चा मालक आहे. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्राँड आहे. त्यामुळे बऱ्याचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषार्काठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.

आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून सुरू झाली आणि 2018 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकलेत.

Web Title: sonam kapoor and anand ahuja marriage sonam told the reason behind that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.