sonam kapoor ahuja calls kangana ranaut a troublemaker during anaita shroff adjanias chat show | कंगना राणौतबद्दल हे काय बोलून गेली सोनम कपूर?
कंगना राणौतबद्दल हे काय बोलून गेली सोनम कपूर?

सोनम कपूर बोलण्यापूर्वी परिणामांची चिंता करत नाही. मनात आले ते बेधडक बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक. आपल्या परखड बोलण्यामुळे सोनमने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. पण यामुळे बदलेल ती सोनम कुठली. अलीकडे सोनमने अनिता श्रॉफ यांच्या ‘फिट अप विद द स्टार्स’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी बोलताना सोनमने पती आनंद व तिच्याबद्दलच्या अनेक रहस्यांवरून पडदा उठवला. केवळ एवढेचं नाही तर कंगना राणौत हिच्याबद्दलही ती भलतेच काही बोलून गेली. अनिता श्रॉफ यांनी सोनमला ‘ट्रबलमेकर’बद्दलचे तिचे मत विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनमने थेट कंगनाचे नाव घेतले. ‘ट्रबलमेकर अर्थात संकट ओढवून घेण्यात कंगना राणौत एकदम तरबेज आहे. ती काचेचे छत तोडू इच्छिते. आता काचेचे छत तोडणार असाल तर तुम्हाला स्वत:ला इजा होणारच ना. माझ्या मते, हे सगळे करण्यासाठी तुम्ही उपद्रवी असणे गरजेचे आहे. केवळ उपद्रवीचं नाही तर तुम्हाला भांड्यात वादळ निर्माण करता आले पाहिजे. कंगना यात निपुण आहे,’ असे सोनम कपूर यावेळी म्हणाली.
सोनम कपूरच्या या वक्तव्यावर अद्याप कंगना काही बोललेली नाही. पण इतके निश्चित तर की, कंगना हे पचवणा-यांपैकी नाही.
खरे तर सोनम बोलली, ते अगदीच चूक आहे, असेही नाही. कारण कंगना पूर्वापार तिच्या चित्रपटांमुळे कमी अन् वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. सध्या तिचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटावरून एक एपिसोड गाजतो आहेच.

 


Web Title: sonam kapoor ahuja calls kangana ranaut a troublemaker during anaita shroff adjanias chat show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.