Sonam Kapoor after the bracelet will say, London, Thumkada! | कंगनानंतर सोनम कपूर ही म्हणणार, लंडन ठुमकदा !

सोनम कपूर लग्नानंतर नक्की कोणत्या शहरात राहणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. सोनम मुंबईत राहणार कि दिल्लीत हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यामागचे कारण आहे की सोनमचा नवरा दिल्लीचा आहे तर सोनम कपूर ज्या फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे ती संपूर्ण मुंबईत आहे. ऐवढेच नाही तर सोनम नुकतेच लंडनमध्ये घर खरेदी केले आहे. ज्यानंतर असा निष्कर्ष लावण्यात येतो आहे की सोनम लंडनमध्ये राहण्याची शक्यता आहे. 

सोनमने स्वत:चा याबाबतचा खुलासा केला आहे. डीएनएला दिलेल्या इंटरव्हुमध्ये सोनमने सांगितले की, ''कोणाच्या ही बाब अजून लक्षात आलेली नाही की मी लंडनमध्येच राहते. तिकडे चार ते पाच महिने राहुन मी मुंबईत येते. लग्नानंतर ही असेच चालणार आहे.''  दुसऱ्या एका इंटरव्हुमध्ये सुद्धा सोनमने गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत आणि लंडनमध्ये येऊन जाऊन रहाते.  
मिड-डे ला दिलेल्या इंटरव्हु ती म्हणाली, ''लग्नानंतर माझ्या आयुष्यात फारसा बदल होणार नाही आहे. महिलांनी लग्ननंतर आयुष्य बदलते हा विचार करणे बंद करावा. जर लग्नानंतर मुलाचे आयुष्य बदलत नाही तर मुलीचेदेखील बदलायला नको. रम्यान, गेल्या ८ मे रोजी सोनम आणि आनंदचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशीच ग्रॅण्ड रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. या फंक्शनचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून, त्यास लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

ALSO READ :  'ही' आहे सोनम कपूरची ‘गॉडमदर’, रिसेप्शनमधील तिचा अंदाज बघून तुम्हीही दंग व्हाल!

सोनमचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सोनम व्यतिरिक्त करिना कपूर-खान, स्वरा भास्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला शशांक घोष यांनी दिग्दर्शित केले आहे. दरम्यान, आनंद आणि सोनमच्या लग्नावरून निर्माण झालेला हा वाद आता पुढे काय वळण घेणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: Sonam Kapoor after the bracelet will say, London, Thumkada!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.