Sonal Chauhan will appear in the music album made on Adult film. | अ‍ॅडल्ट फिल्मवर बनलेल्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार सोनल चौहान!
अ‍ॅडल्ट फिल्मवर बनलेल्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार सोनल चौहान!
‘जन्नत’ आणि ‘बु्ड्ढा होगा तेरा बाप’ यासारख्या चित्रपटाचा भाग राहिलेली अभिनेत्री सोनल चौहान लवकरच सोनल एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. ताज्या बातमीनुसार,  अनुभव सिन्हाच्या ‘50 शेड्स आॅफ ग्रे’ या अ‍ॅडल्ट हॉलिवूड चित्रपटाच्या थीमवर बनलेल्या ‘5 शेड्स आॅफ लव्ह’ या म्युझिक अल्बममध्ये सोनल लीड रोलमध्ये दिसणार आहे. अनुभव काही दिवसांपूर्वी लंडनला गेला होता. त्याने या म्युझिक व्हिडिओवर कामही सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल या अल्बममधील दोन सिंगल सॉन्ग्समध्ये दिसेल. ज्युबिन नॉटियाल या अल्बमला आवाज देणार आहे.  
इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहान गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कुठेही दिसलेली नाही. हिंदी चित्रपटांतून ती जणू गायब आहे. पण   सोनल पाच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.

ALSO READ :पाच वर्षांनंतर परततेय, इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री!!

सोनलने जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ साईन केला आहे. यानंतर सोनलच्या हाती आणखी एक मोठा चित्रपट लागला आहे. होय, महेश मांजरेकर यांच्या गँगस्टर ड्रामात सोनल लीड रोलमध्ये दिसणार आहे. सोनलसोबत या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री श्रुती हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही़ पण स्क्रिप्ट तयार आहे. स्टारकास्टही फायनल झालीय. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होतेय. विजय गलानी व प्रतिक गलानी निर्मित या चित्रपटासाठी निश्चितपणे सोनल कमालीची उत्सूक आहे. महेशजींसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे, असे तिने म्हटले आहे.
यापूर्वी सोनल ‘थ्रीजी’ या चित्रपटात दिाली होती. पण तिचा हा चित्रपट दणकून आपटला होता. हिंदी चित्रपटात नशीबाचे फासे सरळ पडत नसल्याचे पाहून सोनलने तामिळ तेलगू फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला होता. यादरम्यान तिने अनेक तामिळ व तेलगू चित्रपटांत काम केले. सोनलने सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ या म्युझिक अल्बममध्ये ब्रेक मिळाला होता. पुढे ‘जन्नत’मधून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर काही चित्रपटांत सोनल दिसली. पण या चित्रपटांनी तिला बॉलिवूडमधील तिचे स्थान टिकवता आले नाही. आता पाच वर्षांनंतर सोनल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू पाहतेय, यात तिला किती यश येते, ते बघूच.
 
  
Web Title: Sonal Chauhan will appear in the music album made on Adult film.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.